आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात कोकण विभागीय कथाकथन स्पर्धा संपन्न..

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य कै. द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित २२वी कथाकथन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. आठल्ये- सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने या विभागीय स्पर्धेचे आयोजन केले होते. या कथाकथन स्पर्धेत १६ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, परीक्षक अमित पंडित व गुरुराज गर्दे यांच्यासह प्रा. मेघा भालेकर यांची उपस्थिती होती. या कथाकथन स्पर्धेचे परीक्षण शिक्षक, पत्रकार व लेखक अमित पंडित आणि शिक्षक, करिअर मार्गदर्शक, व्याख्याता, कवी, सूत्रसंचालक, तसेच महाराष्ट्रातील अनेक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांचे परीक्षक गुरुराज गर्दे यांनी केले. कथाकथन स्पर्धेचा निकाल

खालील प्रमाणे:-
प्रथम क्रमांक— स्नेहा नितीन शेट्ये(आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख),
द्वितीय क्रमांक — सोनाली मंगेश कदम(न्यू इंग्लिश स्कूल, लांजा), तृतीय क्रमांक— सानिया उदय यादव(न्यू इंग्लिश स्कूल, लांजा),
उत्तेजनार्थ— गौरी अण्णा केतकर(माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज निवे बु।।), उत्तेजनार्थ—कु.ऋतुजा रमेश पवार(आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय,देवरुख).
कथाकथन स्पर्धेच्या समाप्तीनंतर परीक्षक अमित पंडित व गुरुराज गर्दे यांनी सहभागी स्पर्धकांच्या सादरीकरणाचा आढावा घेतला. तसेच उपस्थित स्पर्धकांना कथेची निवड व प्रभावी सादरीकरण याबाबत उपयुक्त माहिती दिली. यानंतर यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे उपस्थित होते.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा कोरे, प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. देवयानी जोशी, प्रा. संचिता चाळके, प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. शिवराज कांबळे, श्री.अक्षय भुवड, सहाय्यक महेंद्र पवार, स्वप्निल कांगणे, हेमंत कदम व अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली.

फोटो- १. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा देताना संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जोशी आणि इतर मान्यवर.
२. कथाकथन स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांसोबत उपस्थित मान्यवर आणि शिक्षक वृंद.

Exit mobile version