चिपळुणात रोटरॅक्टच्या ‘फन-एन-फेयर’च्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ..

यंदा महोत्सवच्या तारखेत पहिल्यांदाच बदल, ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

चिपळूण (ओंकार रेळेकर) सातत्य, कल्पकता व भव्यता अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आणि सर्वानाच उत्सुकता असलेल्या येथील रोटरॅक्ट क्लबच्या ‘फन अँड फेअर’ महोत्सवच्या मंडप उभारणी कार्यक्रमाचा आज शनिवारी शुभारंभ करण्यात आला. गेली पंचवीस वर्षे हा महोत्सव २६ जानेवारी रोजी भरवण्यात येत होता. परंतु यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. त्यानुसार दिनांक चार ते दहा जानेवारी या कालावधीत गुहागर बायपास रोड वरील खेंड-बावशेवाडी येथील मैदानात हा महोत्सव दिमाखात होणार आहे.

दिनांक ४ पासून सुरू होणाऱ्या या महोत्सवामध्ये आठवडाभर रोज रात्री मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गायनाचे व नृत्याचे कार्यक्रम, जादूचे प्रयोग, होम मिनिस्टर असे कार्यक्रम होतील. या महोत्सवाला संपूर्ण जिल्हाभरातील प्रेक्षक भेट देतात. प्रचंड गर्दी होऊनही कुठेही चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी आयोजकांमार्फत घेतली जाते. गेल्या वर्षी या महोत्सवाने २५ वे वर्ष साजरे केले. रोटरॅक्टच्या फन अँड फेअरची सर्वानाच उत्सुकता लागून असते. दरम्यान शनिवारी या कामाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ झाला. चिपळूण मधील उद्योजक वैभव रेडीज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हे काम सुरू करण्यात आले. दर्जेदार अशा या महोत्सवाचा आनंद सर्वांनी लुटावा आणि सहकार्य करावे असे आवाहन आयोजक प्रसाद सागवेकर, फैसल कास्कर, वैभव रेडीज, बाळा आंबूर्ले, शैलेंद्र सावंत, राजेश ओतारी आदींनी केले आहे.

फोटो : रोटरॅक्टच्या ‘फन-एन-फेयर’च्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ करताना वैभव रेडीज यांच्यासह, प्रसाद सागवेकर, फैसल कास्कर, वैभव रेडीज, बाळा आंबूर्ले, शैलेंद्र सावंत, राजेश ओतारी,सतीश कदम छायाचित्रात दिसत आहे(छाया : ओंकार रेळेकर).

Exit mobile version