राजापूर वडदहसोळ येथे दि. १० ते १३ फेब्रुवारी रोजी भव्य यात्रोत्सव.

राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे वडदहसोळ येथे यात्रोत्सवानिमित्त दि. १० ते १३ या दरम्यान भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी सायं ५ वा. आई जुगा जाकादेवी पूजा व आरती, सायं ५.३० कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन, सायं ६ वा पुरुष कबड्डी सामने, दि. ११ रोजी सायं ५ वा. आई जुगा जाकादेवी पूजा व आरती, मुलींची कबड्डी स्पर्धा, दि. १२ फेब्रुवारी रोजी सायं आई जुगा जाकादेवी पूजा व आरती, सायं ७ वा. अंतिम कबड्डी सामना, दि. १३ फेब्रुवारी रोजी स. ९.३० वा श्री सत्यनारायण महापूजा, स. १० ते २ वा. प्रितिश सुरेंद्र माने (जनसंपर्क अधिकारी) यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या वतीने डोळ्यांचा कॅम्प, दु १२ वा. महा‌आरती दु. १ ते ३ महाप्रसाद, दु ३ वा. हळदीकुंकू समारंभ, सायं ७ वा. आरती व प्रदर्शना, रात्री ९ वा. मान्यवरांचे स्वागत व कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ, रात्री १० वा. श्री देवी वाघजाई भरडी नमन नाट्य मंडळ ओझरे खुर्द देवरुख यांचे स्त्री पात्रांनी नटलेले प्रसिद्ध बहुरंगी नमनाचे आयोजन करण्यात आले आहे या जत्रोत्सवाच्या निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जुगा जाकादेवी व्यवस्थापन कमिटी वडदहसोळ सर्व गावकर व ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे

Exit mobile version