कोकण युवा सेवा संस्था यांच्याकडून अभिमानास्पद कामगिरी बद्दल निकिता शेवेकर यांचा सन्मान

मुंबई – (प्रमोद तरळ) आज-काल धावपळीच्या युगात प्रत्येकाचे आयुष्य गतिमान झाले आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा सर्वतच क्षेत्रात कार्यरत आहेत, अशात महिलाच नाही तर पुरुषांना सुद्धा कितीतरी अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागते, अशावेळी गरज असते खंबीरपणे खऱ्या माणुसकीची……आणि ती दाखविणारा संकटाच्यावेळी देव असतो .
काल बुधवारी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करताना एका गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या त्यावेळी वेळेचं अवधान राखून त्याच लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेनं माणुसकी दाखवून तेथेच त्या महिलेची प्रसूती करून सुटका केली.
तिच्या या कार्याची दखल घेवून कोकण युवा सेवा संस्थेचे उरण तालुका संघटक श्री परेश म्हात्रे यांनी कॉल करून माहिती दिली की ज्या महिलेने डिलिव्हरी केली ती उरणची रहिवासी आहे. मग संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष – मा.अभि कोटकर, सचिव – श्री.तृशांत पवार, उपसचिव – श्री.अनिल गावडे, व खजिनदार – सौ.संजना बेंद्रे, यांच्या मार्गदर्शनाने उरण तालुका संघटक – मा.परेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उरणच्या रहिवाशी सौ. निकिता देवेंद्र शेवेकर यांनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरी बद्दल साडी, शाल ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी कोकण युवा सेवा संस्थेचे उरण तालुका संघटक- मा.परेश म्हात्रे यांच्यासह संस्था सदस्य – सौ.स्वप्नाली पाटील, सौ.आरती फुलदाणी,श्री.राहुल कोशे, श्री.मनोज सोनकर, श्री.महेश कोळी,श्री.कुंदन फुलदाणी, ॲड. सौ.पुर्वी कोशे उपस्थित होते.

Exit mobile version