जोगेश्वरीच्या गंडभीर हायस्कूलमध्ये ४५ वर्षांनी भरली १९७८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा..

मुंबई – (प्रमोद तरळ) जोगेश्वरी पूर्व येथील नामांकित अरविंद गंडभीर हायस्कूलच्या १९७८ च्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ४५ वर्षांनंतर नुकतेच शाळेच्या त्याच जुन्या वर्गात वर्ग शिक्षकांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यामध्ये कोकणातील अनेक माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी शाळेत ३९ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. वर्गशिक्षक दिनेशकुमार त्रिवेदी, श्रीमती एन एस कुळकर्णी व नारायण सामंत यांच्या उपस्थितीत हा अभूतपूर्व सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी शाळेचे संपूर्ण आवार व १९७८ च्या दहावीचा तोच वर्ग खाकी वर्दीतल्या रविंद्र पिंपळे व वर्गमित्र अशोक दांडेकर, नारायण पोखरे, सुनील प्रभू,अनंत पुरव या माजी विद्यार्थ्यांनी सजवला. यावेळी शाळेचे माजी शिक्षक सन्मा. नारायण सामंत गुरुजी यांचा सत्कार त्यांचेच माजी विद्यार्थी कॄष्णा खेडेकर, प्रदीप आंगवलकर, डाॅमनिक फर्नांडिस, गणेश दिवेकर, अरुण नाईक अशोक दांडेकर, अनंत पुरव, सुनील प्रभू, चंद्रप्रकाश नकाशे, रवींद्र पिंपळे या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
दहावीच्या वर्गात पहिली आलेली प्रमिला पाडावे व बालविकास विद्यामंदिर शाळेत मुख्याध्यापिका पद भुषविलेली माजी विद्यार्थीनी विजया कदम हिच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या दोघांचा यावेळी सन्मान करण्यात आला श्रीकांत पाटील व राजापूरकर माजी विद्यार्थी ॲड चंद्रप्रकाश नकाशे यांच्याकडून भेटवस्तू व मोतीचूर लाडूचे‌ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली त्यानंतर दिवंगत शिक्षक,माजी विद्यार्थीवर्ग तसेच कर्मचारी वर्गाला श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षकांचे गुणगान समारंभ झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला आजवरचा जीवन वॄतांत कथन केला. प्रदीप आंगवलकर यांनी अधूनमधून हास्याचे फवारे उडविले त्याला गणेश दिवेकर व अनंत पुरव यांनी साथ दिली. ॲड चंद्रप्रकाश नकाशे यांनी आपल्या कवितेचे वाचन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार व ओघवत्या शैलीत केले. विद्यार्थ्यांनी शब्दांकन केलेल्या शिक्षकांच्या सन्मानपत्रांचे वाचन नारायण पोखरे, प्रमिला पाडावे व कॄष्णा खेडेकर यांनी केले यावेळी डॉ मनिक फर्नांडिस यांनी यांनी सजवून आणलेल्या केकचे वर्गशिक्षक श्री त्रिवेदी यांचा ७४ वा वाढदिवस ते वर्गशिक्षक म्हणून शिकवत‌ असलेल्या ‌ वर्ग खोलीत साजरा करण्यात आला यावेळी ‌ त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. कार्यक्रम अगदी नियोजनबद्दपणे पार पडला राष्ट्रगीताने व सर्वांना एकत्र आणणाऱ्या गुरुनाथ तळाशिलकर यांच्या आभार प्रदर्शनाने व एकलनॄत्याने या सुंदर सोहळ्याची सांगता करण्यात आली रांगोळी कार संयोगिता दळवी हिने देखील कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला होता

Exit mobile version