पदमजी कामगार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत.

पुणे : कामगार बंधू यांच्या पदमजी कामगार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कडधे
माही फाउंडेशन, या ठिकाणी दिनांक ११/०२/२०२४, रविवार रोजी अनाथ तसेच, ऊसतोड कामगारांची मुले व मुली तसेच कोरोनामध्ये निधन झालेल्या व्यक्तींची मुले मुली , कोरोना मुळे एकच पालकत्व असणारे मुले मुली,त्याचप्रमाणे मोलमजुरी करणाऱ्यांची मुले मुली,अशा गरजू मुला मुलींना किराण्याच्या व जीवनावश्यक वस्तू तसेच प्रथमोपचार पेटी या स्वरूपात मदत करून त्यांच्याशी संवाद साधला . आणि त्यांचे मनोगत ऐकून घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या पदमजी कामगार सोशल फाउंडेशनच्या मार्फत केलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
आणि मनभरून कौतुक केले. माही फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सौ. विद्या सुनिल बेनगुडे
यांनी व तेथील सर्व संचालक मंडळांनी उपस्थित पदमजी कामगार सोशल फाउंडेशनच्या सदस्यांचे आणि सहकार्य केलेल्या सर्व कामगार बंधूंचे मनापासून आभार मानले. आपली मदत योग्य ठिकाणी पोहोचली असून सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले..

Exit mobile version