“खेलो इंडिया” तायक्वॉंदो स्पर्धसाठी रत्नागिरीतील ४ जणाची निवड.

खेलो इंडिया, तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने व पाँडिचेरी तायक्वॉंदो स्पोर्टस् असोसिएशन आयोजित पाहिली खेलो इंडिया महिला लीग फेज (3)2023-24, दिनांक 27 फेब्रुवारी ते 1मार्च 2024 रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम, इंदिरा गांधीं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाँडिचेरी आयोजन करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य सिनियर गटात श्रुती चव्हाण ५३ किलो खालील, ज्युनियर गटात गायत्री यंशवत शेलार ४६ किलो खालील, कॅडेट गौरी अभिजित विलणकर ५५ किलो खालील्, मृदुला पाटील ५१ किलो खालील, महिला तायक्वॉंदो संघात यांची निवड झाली आहे.
                सर्व विजेत्या खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना गणराज तायक्वांडो क्लबचे श्री.प्रशांत मनोज मकवाना व एस.आर.के तायक्वांडो क्लब चे श्री शाहरुख निसार शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया चे सर्व पदाधिकारी, पालक वर्ग , खेळाडूच सर्व रत्नागिरी तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
विजेते खेळाडूना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, मिलिंद भागवत, गणराज तायक्वांदो क्लबचे पदाधिकारी, व एस.आर.के क्लबचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version