आंबेडकरी चळवळीतील उपेक्षित कलावंताची बैठक संपन्न….

प्रतिनिधी :- (प्रमोद तरळ) गणेशभाऊ खेडेकर, चेंबूर येथील टाट काॅलनी साहित्यिक नामदेव साबळे यांच्या निवासस्थानी महाकवि वामन दादा कर्डक सांस्कृतिक कला साहित्य विचार मंचाच्या कलावंतांची बैठक अध्यक्ष नटवरलाल खरे यांच्या अधिपत्याखालील संपन्न झाली. सदर बैठकीत कलावंताच्या मानधन वाढीचा प्रश्न,बेघर कलावंताचा घरांचा प्रश्न,वृधदपकाळातील आरोग्याचा जटिल प्रश्न, शासनाकडून सेवा सवलतीचा अभाव,वामन दादा कर्डक यांच्या नावे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या यादीत त्यांचे नावं समाविष्ट करून त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्यात यावे.तसेच कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात. कलावंतांची समिती गठीत करणे अदि महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.सदर बैठकीत संस्थेचे अध्यक्ष नटवरलाल खरे ,कार्यकारी अध्यक्ष नामदेव साबळे , सरचिटणीस दिगंबर वानखेडे, रुपचंद भुजबळ , रमेश तायडे, कोषाध्यक्ष गणेशभाऊ खेडेकर , गायिका कल्पना सुर्यवंशी, सुखदेव खरात,मनोहर खरात,सुभाष साळवे, बबन तुपेरे, संतोष भालेराव, आनंद जाधव, वसंत मागाडे, अदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version