शिव शक्ती बाल मित्र मंडळ बहिरवली भागणेवाडी आयोजित महाशिवरात्री उत्सव, विद्यार्थी गुणगौरव सोहळा भव्य दीपोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…..

खेड – (प्रमोद तरळ)शिव शक्ती बाल मित्र मंडळ बहिरवली भागणेवाडी गेली ३६ वर्षे सामाजिक, शैक्षणिक,कला क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे, मंडळातील सर्व सभासद, कार्यकर्ते,पदाधिकारी,महिला मंडळ या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेऊन योग्यपद्धतीने नियोजन करून हा कार्यक्रम छान प्रकारे व्यवस्थित कसा करता येईल हा मानस असतो
या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने आणि महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवगर्जनेने करण्यात आली..कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर विजय सोनू जाधव सरपंच- बहिरवली गाव,विलास भागणे- उपसरपंच बहिरवली गाव,अनंत गोरीवले- अध्यक्ष-१२ गाव कुणबी समाज शेतकरी संघ,शरद कदम-सचिव १२ गाव कुणबी समाज शेतकरी संघ,संतोष मालप-सरपंच-अनसपुरे गाव,हरिश्चंद्र कदम-पो.पाटील-गाव तुंबाड,रामचंद्र घडशी-तंटा मुक्ती अध्यक्ष गाव- तुंबाड,रामचंद्र गोरीवले-माजी सरपंच होडखाड गाव,नूरमुहम्मद चौगुले-तंटा मुक्ती अध्यक्ष-बहिरवली गाव,अब्दुला चौगुले, नैराज चौगुले, अशोक हरावडे, मंगेश शिगवण, बबन शिगवण, रामचंद्र गोरीवले,रणजित घाग गुरुजी, शिर्के गुरुजी,बबन शिगवण (माजी सरपंच- बहिरवली गाव,बाळा रामा लाड, गणपत भागणे- अध्यक्ष शिव शक्ती बाल मित्र मंडळ,प्रकाश भागणे-अध्यक्ष-शिव शक्ती बाल मित्र मुंबई मंडळ, ज्ञानेश्वर भागणे- कार्याध्यक्ष-शिव शक्ती बाल मित्र पुणे मंडळ तसेच मंडळातील सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व, बाहेरील गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आवर्जून उपस्थित राहिले होते,या कार्यक्रमाच्या वेळी वाडीतील सर्व जेष्ठ कार्यकर्ते,नामांकित व्यक्तिमत्व,विध्यार्थ्यां यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले,शेवटी मनोरांजन कार्यक्रम नमन- लोकप्रिय गुडेकर नमन नाट्य मंडळ -मु. बुदरवाडी,ता.चिपळूण, जि.रत्नागिरी यांच्या सुंदर अश्या कलाकृतींने रसिकांचे मने जिंकली… आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छगन सखाराम भागणे यांनी केले.शिव शक्ती बाल मित्र ग्रामीण, मुंबई पुणे मंडळ आणि महिला मंडळ यांचे विशेष आभार मानले.

Exit mobile version