विजय वसंत कांबळे ‘राष्ट्रीय नॅशनल एक्सलंट ॲवॉर्ड २०२४’ पुरस्काराने सन्मानित….

मुंबई:- (प्रमोद तरळ) कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एका छोट्याशा गावांतून शिक्षणासाठी अगदी लहानपणापासून मुंबईत येऊन विजय वसंत कांबळे (पेंडाखळेकर) यांनी अतिशय बिकट परिस्थितीत संघर्ष करत आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह भागवताना सामाजिक क्षेत्रात आपले नावलौकिक केले आहे गेली वर्षे ते तीन मन धनाने समाजाची सेवा करत आहे “जे कां रांजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले”, तोचि‌ साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”, या ओळी त्यांना तंतोतंत लागू पडतात
श्री कांबळे‌ हे‌ गेली १३ वर्षे ‌ म्युनिसिपल मजदूर युनियनचे सक्रिय कार्यकर्ते असून मा. बाळासाहेब आंबेडकर, शरद पवार, शरद राव महाबळ शेट्टी, अशोक जाधव आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र अशा अनेक मातब्बर नेते मंडळी सोबत‌ गेली १३ वर्षे आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन अनेक आंदोलने यशस्वी केली.
कांबळे हे गेली दहा वर्षे विशेषमाला‌ वार्ता वॄत्तपत्राचे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. उपाध्यक्ष मानव विकास संस्था, सदस्य वंचित बहुजन आघाडी गोरेगाव, महासचिव भारतीय दलित साहित्य अकादमी बॄहन्ममुब‌ई, कोरोना काळात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय कांबळे यांना‌ राष्ट्रीय दीपस्तंभ ठाणे यांच्या वतीने नुकताच राष्ट्रीय नॅशनल एक्सलंट ॲवॉर्ड २०२४ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले श्री कांबळे यांना एका वर्षात दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले या पुरस्काराबद्दल विविध सामाजिक संस्था स्वयंसेवी संघटना यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Exit mobile version