राजापूर एस टी डेपोतील मुतारीच्या दुर्गंधीने प्रवाशी हैराण… प्रशासनाचे दुर्लक्ष.

राजापूर – (प्रमोद तरळ)
राजापूर एस टी डेपो म्हणजे कोकणातील एक सर्वात मोठा डेपो व सुसज्य असा गणला जात होता.
राजापूर तालुक्यातील विविध स्तरातून लोक शासकीय कामासाठी, आठवडी बाजारासाठी खरेदी करण्यासाठी गावा गावातून येत असतात. राजापुरात स्थानिक ग्रामस्थ नोकरी निमित्त वास्तव्यास मुंबईला असलेले एप्रिल मे महिन्यात आल्या मुळ गावी येतात.तसेच अख्या महाराष्ट्रातून पर्यटक राजापुरात येत असतात.सध्या उन्हाळे गावात गंगा माई राजापूर मध्ये आल्यामुळे महाराष्ट्रातून गंगा स्नानासाठी पर्यटक राजापूर मध्ये येत आहे. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होत असेल तर याला जबाबदार कोण?
राजापूर एस टी डेपोतील शौचालय मात्र बाहेरून रंगरंगोटी करून जो आतील मुतारीचा भाग आहे. त्या भागात अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे. काही ठिकाणी प्लास्टिक टाकून ठेवलेला आहे. अशा दुर्गंधी अवस्थेत प्रवाशी त्याचा उपयोग कसा करणार ही मोठी समस्या प्रवाशांसमोर आहे. कोकणाला वाली कोण अशी चर्चा दबक्या आवाजात प्रवाशी वर्गामध्ये चालली आहे. यालाच शाश्वत विकास म्हणायचं का ?
प्रशासन मात्र धिम्म?
स्थानिक लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष्य?
वेगवान सरकार याकडे लक्ष्य देईल का ?
असा प्रश्न प्रवाशी वर्गाला पडला आहे.या सर्व गैरसोयीतून प्रवाशांची सुटका कधी होणार आणि सुसज्ज शौचालय प्रवाशांसाठी कधी उपलब्ध होणार हा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ यांना पडला आहे.

Exit mobile version