खेड तालुक्यातील चिंचघर मेटकर वाडी येथे भव्य हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन

खेड:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे चिंचघर‌ मेटकर वाडी येथील जय हनुमान ग्रामस्थ, जय हनुमान क्रीडा मंडळ चिंचघर मेटकर वाडी
हनुमान जयंती उत्सव सोहळा २०२४‌ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे
खेड तालुक्यातील चिंचघर या गावात मेटकर वाडी मधे हनुमान जयंती उत्सव सोहळा दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही दिनांक २२ एप्रिल आणि २३ एप्रिल रोजी मोठया आनंदात आणि उत्साहात साजरा होणार आहे.
सर्व भाविकांमध्ये खुप आनंदाचे वातावरण असते. गावातील सर्व ग्रामस्थ, मुंबईमधील चाकरमानी या आनंदी सोहळ्यास अगदी आवर्जून सहभागी होतात.
या दरम्यान सर्व येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य केले जाते. तसेच कला,क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ आयोजीत केले जातात. पुरुषांसाठी खेळ, महिलांसाठी संगीत खुर्ची व इतर कार्यक्रमाचे नियोजन केले जाते.. सायंकाळी सर्व ग्रामस्थ मिळून हरिपाठ केला जातो, रात्री भजन तसेच पहाटे हनुमंत रायचा पाळणा बोलून दुसऱ्या दिवशी सत्यनारायण महापुजा असते.
त्या निमित्ताने वाडीतील सर्व मंडळी मिळून लहान मुलांचे डान्स, स्त्रियांचे सांस्कृतिक नृत्य, व वाडी मधील सर्व मुले मिळून मनोरंजन म्हणुन नमन करतात. तसेच या महिन्यात उनाच्या खुप झळा सोसाव्या लागत असल्या तरी संपूर्ण महिला वर्ग जेवणाची तयारी करत असतात.

Exit mobile version