ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडीचे कार्य प्रेरणादायी – अवर सचिव चंद्रकांत मोरे

राजापूर – (प्रमोद तरळ) ग्राम विकास सेवा संस्था मांडवकरवाडीचा १० वर्धापन दिन काल सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी बावकर अध्यक्ष अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ, श्री. रविंद्र मटकर सचिव, कुणबी एकीकरण समिती मुंबई प्रदेश, सनग्रेस इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक संचालक श्री. भालचंद्र दळवी सर, माजी उपसचिव महाराष्ट्र शासन श्री. शांताराम कुदळे श्री चंद्रकांत मोरे अवर सचिव ,महाराष्ट्र शासन, श्री संतोष चौगुले संचालक, कुणबी सहकारी बँक लि.तसेच श्री अनिल भोवड संपर्कप्रमुख राजापूर ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रामविकास सेवा संस्थेचे सचिव विलास पळसमकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सभागृहाला मार्गदर्शन केले. दळवी सरांनी संस्था स्थापित करून ग्राम विकासाचे विविध उपक्रम बद्दल त्यांचं अभिनंदन केलं. चंद्रकांत मोरे यांनी संस्थेचे कौतुक करताना या संस्थेचा आदर्श कोकणातील सर्व गावातील संस्थानी घेतला पाहिजे असे प्रतिपादन केलं तर कुदळे साहेबांनी संस्था चालवताना येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात याविषयी आपले अनुभव सांगितले मटकर साहेब यांनी समाज संघटित करण्यासाठी संस्थेची गरज अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून ग्रामीण भागात विकास कामांसाठी व प्रबोधनासाठी अशा संस्था आवश्यक असल्याचे सांगितलं. दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेकडून एक स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दहा वर्षात संस्थेसाठी काम करणाऱ्या प्रमुख सदस्य,पदाधिकारी व सल्लागार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी सल्लागार झिमाजी मांडवकर तसेच अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमात गावातील दहावी, बारावी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कणेरी गावचे सुपुत्र श्री दशरथ पाडावे यांची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून पदोन्नती झाली त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सौ. दर्शना पाडावे यांचा विशेष सत्कार करण्यात आला संस्थेच्या मदतीसाठी लाॅटरीची सोडत मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आली होती या कार्यक्रमासाठी वस‌ई, विरार, डोंबिवली,नवी मुंबई या भागातून अनेक मुंबईकर आपल्या कुटुंबियांसहित हजर होते कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सनेहभोजनाचा आनंददायी कार्यक्रम संस्थे तर्फे आयोजित करण्यात आला होता.

Exit mobile version