नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत येळवण नं .१ चा विद्यार्थी श्रीपाद चव्हाण याचे घवघवीत यश..

ऱाजापूर – (प्रमोद तरळ) जानेवारी २०२४  मध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शाळा येळवण नं. १ चा विद्यार्थी श्रीपाद विठोबा चव्हाण यांने राज्यामध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याला या परीक्षेत २०० पैकी १९२  गुण  (९६ टक्के ) मिळाले आहेत. 
येळवण सारख्या ग्रामीण भागात राहून सुद्धा या विद्यार्थ्याने उज्ज्वल यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी त्याला  शाळेतील शिक्षक विशाल घोलप, त्याची आई सौ. अनघा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यपक प्रमोद जाधव, मार्गदर्शक विशाल घोलप  यांनी येळवण शाळेच्यावतीने त्याचा सत्कार केला. या कार्यक्रमाला श्रीपादचे वडिल विठोबा चव्हाण, अंगणवाडी सेविका सौ. रिया तरळ, सौ. आयरे व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version