ज्योतीप्रभा पाटील युरोपला रवाना; डच राष्ट्राच्या सम्राट विल्यम अलेक्झांडर द सेकंद यांची भेट शक्य.

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षा तर्फे इच्छुक उमेदवार ज्योतीप्रभा पाटील डच राष्ट्राच्या सम्राटांशी आणि डच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला भेट देण्यासाठी तसेच शैक्षणिक कामासाठी युरोपला रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक चित्राच्या परताव्याबाबत चर्चा करण्यासाठी ते 31 जुलै 2024 रोजी डच राजधानी “द हेग” मध्ये मंत्रालयाची भेट घेणार आहेत. हे चित्र अत्यंत भावनिक मूल्याचे आहे आणि या चित्राचा परतावा म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे संरक्षण. ज्योतीप्रभा हे 2022-2023 मध्ये डच राजधानीत आंतरराष्ट्रीय सामाजिक अध्ययन संस्थेत शिक्षण घेत होते, परंतु 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी आपले शिक्षण थांबवले. ज्योतीप्रभा पाटील यांचं नातं देसले कुटुंबाशी असून या कुटुंबाने औरंगजेबाच्या काळात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील आक्रमणांपासून संरक्षण करण्याचे महत्वाचे कार्य केले होते. त्यांच्या या ऐतिहासिक योगदानाची आठवण ठेवत ज्योतीप्रभा यांनी डच राष्ट्राच्या सम्राटांना विनंती केली आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचे चित्र भारतात परतवावे. इतिहासात मराठ्यांचे डच राष्ट्रासोबतचे संबंध चांगले होते, ज्यामध्ये व्यापार आणि लष्करी सहकार्याचा समावेश होता. डच सरकारच्या सांस्कृतिक वारशाच्या परताव्याच्या निर्णयानुसार, ज्योतीप्रभा यांनी 7 मार्च 2019 रोजीच्या “Return of Cultural Objects: Principles and Process National Museum van Wereldculturen” या मार्गदर्शक तत्वांचा आणि 29 जानेवारी 2021 रोजीच्या “Redressing an Injustice by Returning Cultural Heritage Objects to Their Country of Origin” या बातमीचा संदर्भ दिला आहे. 2019 साली डच सम्राट आणि सम्राज्ञी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी आम आदमी पार्टी शासित दिल्लीला भेट दिली आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत शाळांचे दौरे केले होते. ज्योतीप्रभा सध्या संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालयाच्या कार्यकारी कार्यालयाचे माजी संचालक डॉ. किशोर मंध्यान यांच्या सहकार्याने आम आदमी पक्षासोबत कार्यरत आहेत. ज्योतीप्रभा यांचे हे पाऊल महाराष्ट्र-डच सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एक नवा अध्याय उघडेल अशी आशा आहे असे ज्योतीप्रभा पाटील म्हणाले… दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version