ग्रामपंचायत राजवाडी मधील शिपाई भरती प्रक्रिया नियमबाह्य; उमेदवार प्रसाद कामत यांचे मत.

प्रतिनिधी : सामिर शिरवडकर-रत्नागिरी

राजापूर: ( राजवाडी):- राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत राजवाडी मधील शिपाई भरती ही अनधिकृत झाली असुन, त्यावर कायदेशीर कारवाई करावी अश्या आशयाचे पत्र उमेदवार आणि गेली १४ वर्ष डाटा ऑपरेट कार्यरत प्रसाद कामत यांनी जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. सदर, विषयी ग्रामपंचायत राजवाडी मध्ये शिपाई भरती साठी कोणतीही पेपर नोटीस देता,सर्व नियम धाब्यावर बसवून फक्त ग्रामपंचायत मासिक सभेत सविस्तर चर्चा करून आलेल्या चार उमेदवार पैकीं एकाची निवड करून बाकी अर्ज रद्द केले आहेत. जणू निवड प्रकियेचे पूर्ण अधिकार ग्रामपंचायतीला दिले आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे?प्रशाशकीय भरती प्रक्रिया ही पारदर्शक असणे गरजेचे आहे.परंतु ह्या प्रकरणी असे दिसून येत नाही.
अश्या, या अनधिकृत निवड प्रक्रिया बाबत उमेदवार,आणि १४ वर्षे अनुभव असलेले कामत यांनी या संपूर्ण प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. नुकत्याच चालू असलेलं महाराष्ट्र मधील पूजा खेडकर हा विषय ताजा असताना या ग्रामीण भागत सुध्दा अश्या प्रकारच्या घटना घडू शकतात.यावर मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version