भाजप कार्यकर्ते आक्रमक होत रत्नागिरी शहरातील खड्ड्यांमध्ये बसून वृक्षारोपण करत केले आंदोलन.

रत्नागिरी शहरांमध्ये डांबरीकरण रस्त्याचे केलेले काम आर.डी. सामंत कंपनीनेच केले : मुख्याधिकारी तुषार बाबर.

नगरपालिका प्रशासनाचे करायचे काय खाली डोकं वर पाय घोषना देत रस्ते ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची केली मागणी..

रत्नागिरी : शहरात गेले महिनाभर रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती झाल्यामुळे भाजप रत्नागिरी शहराने आज खड्ड्यामध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करत आक्रमक भूमिका घेतली. तीन-चार ठिकाणी झाडे लागवड करून खड्ड्यामध्ये बसून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले त्यानंतर नगरपालिकेवर धडक मारत मुख्याधिकाऱ्यांना फैलावर घेतले. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, एसटी स्टॅंड, तेलीआळी नाका व जयस्तंभ येथे प्रतिकात्मक वृक्षारोपण करत आंदोलन केले. नगरपालिकेवर धडक मारल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना बोलावण्यात आले परंतु मुख्याधिकारी बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते ते येईपर्यंत आम्ही दोन तास सुद्धा वाट पाहू असे सांगितल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना फोन करण्यात आला त्यांनी दहा मिनिटात येतो असे सांगितले त्यानंतर मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित झाले. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना फैलावर घेतले रस्त्याचा दर्जा चांगला नाही, डांबर चांगले नाही यामुळे खडी वर आली आहे. जे या खड्ड्यांमध्ये पडले आहेत व जखमी झाले आहेत त्यांना नगरपालिकेने नुकसान भरपाई दिली पाहिजे. अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच डांबरीकरणाचा दर्जा चांगला नसेल तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी ही भाजपा अधिकाऱ्यांनी केली.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमी गेला उत्तर देताना मुख्याधिकारी यांची दमछाक झाली. रत्नागिरी शहरातील मागील वर्षभरात डांबरीकरणाचे घेतलेले काम आर.डी. सामंत कंपनीने घेतलेले आहे अशी कबुली मुख्याधिकारी यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर दिली. आजपर्यंत या रस्त्यांचे पैसे दिले गेलेले नाहीत आणि देणारही नाही असे मुख्याधिकारी यांनी भाजप कार्यकर्त्यांनशी बोलताना सांगितले. आता मुख्याधिकारी या रस्ते ठेकेदाराला काय अधिक टाकणार का हे पाहावे लागेल.
यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले खड्डे भरण्यासंबंधी प्रशासनाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन दिले होते. तसेच भाजपा आय.टी. जिल्हा संयोजक निलेश आखाडे यांनी देखील निवेदन देत खड्डे त्वरित भरा, रस्त्यावरील खडी गोळा करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देखील दिला होता. प्रशासनाने खड्डे भरले नाहीत. जो ठेकेदार याला जबाबदार आहे त्याला काळ्या यादीत टाका. कामे व्यवस्थित करणार नसाल तर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात करावे लागेल. सर्व शहरवासियांना घेऊन अधिक तीव्रतेने आम्ही आंदोलन करू. रस्त्याच्या परिस्थितीमुळे नागरिक पडत आहेत, डांबरीकरणाची खडी वाहून जात आहे. याकडे कोणी लक्ष देत नाही. पालिकेत अंदाधुंदी कारभार सुरू आहे. या प्रसंगी पुढील आठ दिवसात खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करू असे आश्वासन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले.
आज सकाळी आठवडा बाजार येथील खड्ड्यांमध्ये झाडांच्या फांद्या लावून माती टाकण्यात आली. या वेळी पदाधिकाऱ्यांच्या गर्दीमुळे वाहतूककोंडीही झाली. त्यानंतर तेलीआळी नाका, एसटी बसस्थानकासमोरील खड्ड्यांतून प्रतिकात्मक वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी डांबरचोर हाय हाय, या प्रशासकाचे करायचे काय खाली डोकं वर पाय, रोड कॉन्ट्रॅक्टर हाय हाय, भाजपाचा विजय असो, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रत्नागिरी दणाणून सोडली.

शहरातील परिस्थितीविषयी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना फैलावर घेत प्रश्नांचा भडीमार केला. शहरात जे डांबरीकरणाचे काम झाले त्याच्या खडीचा नमुना तपासला का, डांबराचा दर्जा तपासला आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या कामाचा दर्जा सुमार वाटतो, वारंवार खडी वाहून जात आहे. त्यामुळे पालिकेकडे अहवाल असेल तर तो आम्हाला दाखवा, असे मयेकर यांनी ठणकावून सांगितले तर माजी नगरसेवक राजू तोडणकर यांनीही शहरात डेंगीचे अनेक रुग्ण सापडत आहेत. एवठ्या मोठ्या शहरात फक्त चार माणसं फवारणी करत आहेत. ते शक्य नाही. माणसं वाढवा, अशी सूचना केली.
या आंदोलनात शहराध्यक्ष राजन फाळके, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, निलेश आखाडे, प्रशांत डिंगणकर, शिल्पा मराठे, मंदार मयेकर, दादा ढेकणे, बाबू सुर्वे, विक्रम जैन, अशोक वाडेकर, मन्सूर मुकादम, नितीन जाधव, मंदार खंडकर, अमित विलणकर, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version