भाजप कडून कारगिल विजय दिवसानिमित्त माजी सैन्य अधिकारी व सैनिकांचा सत्कार; बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.

रत्नागिरी :- २५ व्या कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील सशस्त्र सैन्य दलातील अतुलनीय शौर्य व देशसेवा बजावलेल्या माजी सैनिक व सैन्य अधिकाऱ्यांचे प्रातिनिधिक सत्कार स्वयंवर हॉल, माळ नाका, रत्नागिरी येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकणचे नेते नामदार रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र भाजपा प्रदेश महामंत्री आदरणीय विक्रांत दादा पाटील, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार एडवोकेट निरंजन डावखरे साहेब ,प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर, माजी आमदार बाळ माने तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर उपक्रमाळा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच माजी सैन्य अधिकारी व सैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

सदर उपक्रम भाजप युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.ऋषिकेश केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. सैन्य दलातील माजी सैनिक व अधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम राबविल्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून आनंद व्यक्त होत आहे.

Exit mobile version