नरसेवा हीच नारायण सेवा नागरिकांनी आपले आरोग्य तपासणी करून मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. : मा.खा.अशोक नेते.

ब्रम्हपुरी:-भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी विधानसभा आयोजित भाजपाचे लोकप्रिय नेते, माजी आमदार मान.प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महा आरोग्य शिबिर नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय सभागृह ब्रह्मपुरी येथे‌ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मा.खा.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते यांनी बोलतांना आरोग्य हीच संपती आहे.तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.आज माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संबंधित या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला गेला अतिशय चांगला स्तुतीमय कार्यक्रम आहे.नरसेवा हीच नारायण सेवा आहे. याचा जास्तीत जास्त नागरिक जनतेनी शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबिराला शुभेच्छा देत अतुल भाऊ यांना वाढदिवसा निमित्त दिर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो.असे प्रतिपादन या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मा.खा.अशोक नेते यांनी व्यक्त केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने ब्रम्हपुरी विधानसभेचे लोकप्रिय नेते तथा माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, विधानसभा प्रमुख प्रा.कादर शेख सर, तालुकाध्यक्ष अरुनजी शेंडे,शहराध्यक्ष अरविंदजी नांदुरकर,जिल्हा संघटनमंत्री संजयजी गजपुरे,जिल्हा महामंत्री प्रकाश जी गेडाम,महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा सौ.वंदना ताई शेंडे, माजी जि.प.उपाध्यक्ष कृष्णा भाऊ सहारे,गडचिरोली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ तिडके, जिल्हा सचिव तथा युवा नेते तनय देशकर,जिल्हा सचिव साकेत भानारकर,माजी सभापती रामलाल दोनाडकर,युवा नेते प्रा.सुयोग बाळबुद्धे,स्वप्नील अलगदेवे,प्रा.सोलोटकर सर, राजुभाऊ भागवत, दिलिप जुमडे, तसेच मोठया संख्येने शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिक बंधू भगिनीं उपस्थित होते.

शिबिरामध्ये होणाऱ्या मोफत तपासणी-
हृदयरोग तपासणी, छातीचे रोग, मूत्रपिंड, मुतखडा, कर्करोग तपासणी, जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, ईसीजी,नेत्र तपासणी, दंत तपासणी इत्यादी आजारावर मोफत तपासणी व शिबिराचा लाभ घ्यावा. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version