जयगड मधील ते अनधिकृत बांधकाम भारतीय क्रिकेटपटूचे; मंडळ अधिकारी यांच्या अहवालात निष्पन्न.

रत्नागिरी:- ( जयगड) :- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड मधील ग्रामपंचायत रीळ येथील समुद्र किनारी केलेले बांधकाम आत्ता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्मा.समीर शिरवडकर यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी तहसील कार्यलयाला संमधीत बांधकामा बाबत पत्राद्वारे विचारणा केली होती. सदर बांधकाम हे समुद्र किनारी असून, संपूर्ण बांधकाम अनधिकृत असून,वाळूचा भराव करून, आजूबाजूला असलेले कांदळवनाची तोड करून केले आहे.मुळात जागा ही महाराष्ट्र सागरी मंडळ याची असूनही कोणताहि विभागाची परवानगी घेतलेली दिसून येत नाही.त्यासाठी मा. तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.
सदर,पत्रावर तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करून तसा अहवाल आणि पंचयादी करण्यासाठी मंडळ अधिकारी यांना आदेशीत केले.पंचयादी आणि मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार ग्रामपंचायत रीळ मधील हे बांधकाम गट क्र.६४४ क्षेत्र ०.०४.३० या मिळकत समुद्रच्या बाजूला असून,सदर चे बांधकाम करतांना आजूबाजूची खारफुटी कांदळवन तोडून समुद्राच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे.सदर बांधकाम ७/१२ नुसार ४३० चौ. मी.आहे,परंतु त्यांनी केलेले बांधकाम हे ४३.७० मी.लांब व १५.६० रुंद असे एकूण ६८१.७२ चौ.मी.आहे.सदर बांधकाम हे ७/१२ पेक्षा जास्त आहे.त्यामुळे वाढीव समुद्राच्या हद्दीत केले आहे हे सिद्ध होते.परंतु गटबुक नकाशा नसल्याने किती अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे याची मोजणी करता येत नाही.त्याचप्रमाणे सदर बांधकाम हे चि ऱ्या चे असलेने त्याच्या आत २० ते ३० ब्रास वाळूचा भरणा केला आहे.याची सुद्धा परवानगी नसलेचे दिसून येते.
वरील,संपूर्ण विषयी शासकीय जमिनी बाबत महाराष्ट्र सागरी मंडळ रत्नागिरी, खारफुटी कांदळवन तोड वन विभाग रत्नागिरी, वाळू उपसा, वाढीव बांधकाम तहसील रत्नागिरी काय कारवाई करतील यावर लक्ष लागले आहे.

समनधित विषय त्या त्या विभागाकडे वर्ग केला आहे,आणि या संपूर्ण विषयी कारवाई होणार; निवासी नायब तहसीलदार रत्नागिरी -माधवी कांबळे.

Exit mobile version