देवरुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या तनिष खांबेची शालेय तायक्वांदो विभागीय स्पर्धेसाठी निवड.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी तनिष विनायक खांबे(११वी कला) हा जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेतील १९ वर्षाखाली ५१ ते ५५ किलो वजनी गटाचे विजेतेपद प्राप्त करून, कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तनिष याने गतवर्षी राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत१७ वर्षाखालील गटात चमकदार कामगिरी केली होती. तनिष खांबे हा देवरुख नगरपंचायत तायक्वांदो क्लबमध्ये सराव करतो. तनिष याला तायक्वांदो प्रशिक्षक श्री. शशांक घडशी आणि सहकारी, तसेच महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तनिष याने मिळवलेल्या यशासाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिमखाना समन्वयक प्रा. सानिका भालेकर, प्रा. सागर पवार आणि प्रा. धनंजय दळवी उपस्थित होते. तनिषचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो- तनिष खांबे याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, प्रा. पवार आणि प्रा. सौ. भालेकर. छाया- प्रा. धनंजय दळवी.

Exit mobile version