‘आप’ पक्षाचे गुजरात निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे असणार..? अरविंद केजरीवाल यांनी केली मोठी घोषणा.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्ष मैदानात उतरले असून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. गुजरात निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होते यावेळेस मात्र गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर करत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
       अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आहे. ही जबाबदारी इसुदान गढवी यांच्यावर सोपवण्यात आल्याचे आम आदमी पक्षाने सांगितले आहे. आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि सरचिटणीस मनोज सोराटीह्या हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते मात्र पक्षाने अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात इसुदान गढवी यांना 73 % मते मिळाली. त्यामुळे आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव जाहीर केले असल्याचे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
        इसुदान गढवी हे शेतकरी कुटुंबातील असून मागास जातीतील आहेत. आणि राज्याच्या लोकसंख्येत 48% हे मागास प्रवर्गातील लोकसंख्या आहे. आणि म्हणूनच आपने गढवी यांचे नाव जाहीर केल्याची देखील बोलले जात आहे. गुजरात निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिनींनी केलेल्या सर्वेनुसार भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वाधिक मतं घेणारा पक्ष ठरणार आहे. तर दोन नंबरची सर्वाधिक मते घेत काँग्रेसला मागे टाकत आप हा विरोधी पक्ष ठरू शकतो. असे देखील काही सर्वे मध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे ‘आप’ किती सीट मिळवणार याकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागून राहिले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version