वडगाव येथील सिमेंट काँक्रिट रस्त्या- बद्दल ठेकेदाराचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर..

प्रतिनीधी : प्रसाद गांधी.

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील वडगाव बु. येथे “जलयुक्त शिवार अभियान” अंतर्गत सन २०१८ – २०१९ या आर्थिक वर्षात सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्यात आलेला आहे, सदर बंधार-याच्या कामात भ्रष्टाच्यार झाला असून काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याचे दिसून येत आहे ,असे श्री. सचीन अनाजी मोरे. रा. घाटकोपर, मुळ गाव वडगाव बु. यांनी पत्राद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दीले आहे.
     सव्विस्तर वृत्त असे की, “जलयुक्त शिवार अभियान” अंतर्गत सन २०१८-१९ मु. पो. वडगाव बु., ता. खेड, जि. रत्नागिरी येथे जगबुडी (कुंभा) नदीवर सिमेंट कॉंक्रिटचा बंधारा बांधण्यात आला, सदर बंधा-याचा ठेका श्री. प्रथमेश रमेश राठोड, या ठेकेदाराकडे देण्यात आला होता. या बंधा-यावरती 21,95,000 (एकवीस लाख पंच्यान्नव हजार) रूपये खर्च करून सुद्धा नदितील पाण्याचा साठा होत नसल्याचे दिसून येत आहे. सदर बंधा-याची अवस्था दयनीय असून बांधकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी नागरीकांमधुन होत आहे., तसेच सदर बंधा-याची प्राथमीक चौकशी दि. 08/12/2022 रोजी करण्यात येणार आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version