गोरेगांवात श्री जय भवानी मातेचा २५ वा वर्धापनदिन उत्साहात.

प्रतिनिधी : राम भोस्तेकर माणगाव

रायगड : माणगांव गोरेगांव, येथील डोंगर परिसरातील श्री जय भवानी मंदिरातील मातेचा २५ वा.वर्धापन दिन उत्सव सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.२५ व्या वर्धापनदिना निमित्ताने पहाटे पासून गणेश पुजन,भवानी माता श्री सुक्त अभिषेक,भवानी मातेचा पालखी सोहळा,मातेचा जोगवा,श्री सत्यनारायणाची महापूजा,तिर्थ प्रसाद, महाप्रसाद,तर रात्री रत्नागिरी येथील श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रसंगी श्री जय भवानी माता ग्रांमस्थ व महिला मंडळाने संपूर्ण परिसरातील रस्ते रांगोळी काढून सुशोभित केले होते.तर विलास शिंदे यांनी उत्कृष्ट पध्दतीने सर्व परिसरात नेत्रदिपक विद्युत रोषणाई व डेकोरेशन केले होते.या उत्सव सोहळ्याला महाड, पोलादपूर,माणगांवचे आम.भरतशेठ गोगावले,प्रमोद घोसाळकर,अरुण चाळके, स्थानिक नेते श्रीनिवास बेंडखळे,विजयराज खुळे सरपंच जुबेर अब्बासीआदीसह अन्य पक्षाचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्त्यानी,मान्यवरांनी उपस्थिती राहून श्री भवानी मातेचे दर्शन घेतले.
भवानी मातेच्या २५ व्या वर्धापनदिना निमित्ताने आयोजित केलेले सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न व्हावे म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरज पवार,माजी ग्रां.प.सदस्य चेरफले,नवतरुण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी नेमाणे, कार्याध्यक्ष मनोहर खुटवळ, राकेश नलावडे, अमरिश नेमाणे, उपाध्यक्ष संतोष लोणेरकर,खजिनदार,रमेश बोंडिलकर,रोशन नेमाणे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी,ग्रांमस्थ,महिला मंडळ व नवतरुण मंडळाने भरपूर मेहनत घेतली.

Exit mobile version