मृत्युशी झुंज देणाऱ्या वृद्ध महिलेला विठाई हॉस्पिटलमध्ये मिळाले जीवदान.

डॉक्टर टीम चे सर्वत्र कौतुक.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) घरगुती कामात व्यस्त असताना नजरचुकीने हाताच्या वाटे भलामोठा पिन घशात अडकून गंभीर रित्या दुःखापत झालेल्या गुहागर तालुक्यातील एका वृद्ध महिलेवर यशस्वी रित्या उपचार करून चिपळूणमधे अल्पावधीतःच नावारूपास आलेल्या विठाई हॉस्पिटल मध्ये महिलेला जिवदान मिळाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गुहागर तालुक्यातील शृंगारतळी नजिकच्या गांवातील सर्वसामान्य कुटूंबातील असणाऱ्या झुलेखा अहमद ममतुले वय वर्ष ७० या महिलेने शुक्रवार् दि. १४ ऑक्टोबर रोजी घरगुती कामात व्यस्त असतांना नजरचुकीने तोंडाच्या वाटे अंदाजे एक इंच लांबीचा पिन गिळला हा पिन घशात जाऊन उघड्या अवस्थेत अडकून बसला होता या नंतर या महिलेला गंभीर स्वरुपाच्या कळा जाऊ लागल्या जवळपास चांगले उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून कुटुंबातील लोकांची चांगलीच
धावपळ झाली अखेर १४ ऑक्टोबर रोजी विठाई हॉस्पिटल मध्ये या महिलेला पुढील उपचारासाठी दाखल केले विठाई हॉस्पिटल मधील नामवंत डॉ. गोपाळ चिंगळे (एम.डी मेडिसीन),कान,नाक ,घसा तज्ञ् डॉ.मनोहर सूर्यवंशी,भुलतज्ञ् डॉ.अमोल कदम यांच्या टीमने तत्काळ महिलेला आयसीयु विभागात दाखल करून घेत उपचार सुरु केले अखेर सुमारे एक तास हून अधिक वेळेनंतर या महिलेच्या मानेजवळ अडकलेला पिन यशस्वीपणे बाहेर काढण्यात विठाई हॉस्पिटल मधिल डॉक्टर टीमला यश असे.अखेर दुसऱ्या दिवशी दि. १५ ऑक्टोबर रोजी झुलेखा अहमद ममतुले या वृद्ध महिलेस सुखरूप पणे घरी सोडण्यात आले.ममतुले कुटुंबियांनी विठाई हॉस्पिटल आणि संपूर्ण डॉक्टर टीम चे विशेष आभार मानले असून यशस्वी शास्त्रक्रीये बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

फोटो : झुलेखा ममतुले या वृद्ध महिलेच्या घशात अडकलेला पिन एक्सरे मध्ये छायाचित्रात दिसत आहे(छाया : ओंकार रेळेकर)

दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version