मिरजोळे येथे चालत जाणाऱ्या तीन मुलींना बस चालकाने दिली धडक

रत्नागिरी : रत्नागिरी मिरजोळे एम.आय.डी.सी.गद्रे कंपनीकडे चालत जाणाऱ्या तीन मुलींना एसटी बस चालकाने धडक दिल्याची घटना घडली असून एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          अधिक माहिती अशी की कु. धनश्री डावल, कु. मयुरी आणि ऋतुजा शिंदे या तिघी रस्त्याने चालत जात असताना स्वरुपानंद नगर येथील सरस्वती जनरल स्टोअर्स समोर मागून येणाऱ्या बसने ऋतुजा शिंदे हिला धडक दिली. या धडकेत ऋतुजा हिला दुखापत झाली. एसटी बस चालक अकिल अब्दुल लतिफ बंदरकर (53, मिल्लतनगर बी 203, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. या अपघातात ऋतुजा शिंदे (21, ओरी देणवाडी, सध्या रा. शिरगाव) ही जखमी झाली. ही घटना 3 डिसेंबर रोजी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी एसटी बस चालक अकिल अब्दुल लतिफ बंदरकर याच्यावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
*दखल न्यूज महाराष्ट्र*

Exit mobile version