डी.बी.जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे मिरजोळीत शानदार उद्घाटन.

चिपळूण : नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी बी जे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रामीण पुनर्रचना निवासी मिरजोळी तालुका चिपळूण येथे झाडाच्या कुंडीला पाणी घालून शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या नियमक समितीचे चेअरमन श्री मंगेशजी तांबे, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल चे कार्यकारी चेअरमन श्री हैदर हुसेन दलवाई हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एस बापट होते या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मिरजोळी ग्रामपंचायतीचे सरपंच मा.श्री.कासमभाई दलवाई, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे सेक्रेटरी जावेद दलवाई,इब्राहिम दलवाई नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य व नॅशनल इंग्लिश स्कूलचे सदस्य लियाकत दलवाई, ग्रामपंचायतच्या सदस्या प्रचिती भैरवकर, मिरजोळीच्या पोलीस पाटील सौ नंदनी पवार, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका शबनम फ़रिदी, दलवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहित जाधव ग्रामसेवक सुभाष माळी, तलाठी सतीश जाधव तर महाविद्यालयाची उपप्राचार्य डॉ. एम.एस चांदा, रजिस्ट्रार सौ लीना भाटिया इत्यादी उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी हैदर दलवाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की राष्ट्रीय योजनेच्या शिबिरातून नवीन शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाची भूमिका महत्त्वाची असते यावेळी लियाकत दलवाई यांनीही विद्यार्थ्यांना वैयक्तिक काळजी कशी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केले तर दलवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाली की आयुष्यात अशा शिबिराची कायम आठवण देणारी शिदोरी असते आणि अशाच शिबिरातून मिळत असते देशातील सुजान नागरिक घडत असतो शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एस.बापट यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त कशी बाळगावी विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव अशा वेगवेगळ्या शिबिरातून होत असते आणि विद्यार्थी हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वावलंबी बनत असतो असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. उत्तम सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.ज्ञानोबा कदम यांनी मांडले तर सूत्रसंचालन प्रा.गौतम ब्रह्मे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ राहुल पवार प्रा. परमेश्वर डिंगणकर प्रा. राम साळवी प्रा. ए एस शेवडे प्रा. सौ पी ए काटदरे प्रा. एस एस गोखले प्रा. एस ए चिकटे प्रा. पी ए वाघमारे प्रा. जी.एस तांडेल प्रा. एस वी भिडे प्रा. प्रा. पी एस शिंदे प्रा. एम.एस.शिंदे,प्रा. एस व्ही भाटवडेकर आणि शिबिरातील विद्यार्थी स्वयंसेवक अथक परिश्रम करीत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version