“भुवड माऊलींचे” समर्थक या माध्यमातून लांजा तालुक्यातील माचाळ गावातील विद्यार्थ्यांना “एक हात मदतीचा”

लांजा – (प्रमोद तरळ) रविवार दि. २१ मे २०२३ रोजी विलेपार्ले येथे लांजा तालुक्यातील माचाळ गावातील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख,पत्रकार,समाजसेक ता.खेड पन्हाळजे गावचे सुपुत्र राजेंद्र सखाराम भुवड यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक/पत्रकार/कवी सुदर्शन जाधव,समाजसेवक- महेंद्र शिगवण,चंद्रकांत जावळे, सौ.पुजा राजेंद्र भुवड, सौ.शमिका महेंद्र शिगवण आणि माचाळ गावचे शाहीर-रुपेश मांडवकर यांच्या सहकार्याने लांजा तालुक्यातील माचाळ या गावी वडिलांचे छत्र हरवलेल्या कु.रितेश आणि कु.तेजस या विद्यार्थ्यांना “एक हात मदतीचा” माध्यमातून शैक्षणिक खर्चासाठी रोख रक्कम ३०००रु/ व शैक्षणिक वस्तू,पेन,पेन्शन, पाणी बाँटल बँग,वह्या देण्यात आल्या. यावेळी माचाळ गावचे गावकर एक आदरणीय व्यक्तिमत्व श्री.अशोक पाटील, श्री.प्रदीप मांडवकर, श्री.संदिप मांडवकर, श्री.विजय गोवलर, श्री.सोमा भातडे आणि माचाळ गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या कडे आम्ही सुपूर्द केली आणि यावेळी माचाळ गावच्या वतीने भुवड माऊलीचे समर्थक टिमचे आभार मानण्यात आले यावेळी कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यात आले..

जाहिरात
Exit mobile version