रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा निर्धार..

चिपळुनात काँग्रेसच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळुनात काल झालेल्या काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हास्तरीय बैठकीत जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध विभाग, सेल, महिला आघाडी यांच्या बैठका आणि मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक शनिवारी चिपळुणातील ब्राह्मण सहायक संघाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली.बैठकीला माजी खासदार व ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई, ज्येष्ठ नेते रमेश कीर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मनोज शिंदे आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीत बुथ कमिट्या स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर पक्षसंघटना वाढीसाठी विविध विभाग, सेल, महिला आघाडी यांच्या बैठका आणि मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, जिल्हा प्रवक्ते इब्राहिम दलवाई, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष खलिल सुर्वे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष हारिस शेकासन, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, चिपळूण तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष निर्मला जाधव आदी उपस्थित होते. नाट्यप्रेमी अभय दांडेकर यांना नाशिक येथील बहुउद्देशीय संस्थेतर्फे जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल काँग्रेसच्या जिल्हास्तरीय बैठकीत दांडेकर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी चिपळूण शहर काँग्रेस अध्यक्ष लियाकत शाह यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो : काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी खासदार हुसेन दलवाई छायाचित्र दिसत आहेत सोबत मनोज शिंदे,अविनाश लाड,रमेश कीर,प्रशांत यादव आणि मान्यवरछायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर) दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..
Exit mobile version