हातखंबा गावात विकास कामांसाठी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिला ५.५० कोटीचा निधी

पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत विविध कामांचे भूमिपूजन महिला भगिनींच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णय

पालकमंत्री म्हणून तुमची सेवा करण्याची जबाबदारी माझी :- ना.उदयजी सामंत

हातखंबा गावाच्या विकासाचा रथ असाच पुढे नेणार असाचे पालकमंत्री यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावाच्या विविध विकास कामांसाठी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी ५.५० कोटी रुपयाचा निधी देत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले आहे.गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द पालकमंत्री यांनी दिला आहे.
महिला वर्गासाठी विविध योजना शासन राबवत आहे.महिलां स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत.उद्योग धंद्यात महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेवून उद्योग सखी व्हा.राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याचे काम पालकमंत्री म्हणून मी करणार आहे.हातखंबा गावातील विकासाचा रत असाच पुढे नेणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमासाठी तालूका प्रमुख महेश उर्फ बांबू म्हाप,सुर्वे मॅडम,कांचन नागवेकर विभाग प्रमुख सचिन सावंत,मुन्ना देसाई,निवळी सरपंच तन्वी कोकजे,हातखंबा सरपंच जितेंद्र तारवे,प्रमोद लकेश्री,सुरेश तार्वे,मनीषा देसाई,रमाकांत बोंबले,प्रमोद डांगे,योगेश सनगरे,शांताराम कदम संजय भुते सुनील डांगे आदी प्रमुक उपस्थित होते.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवळी गावातील ८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख महेश म्हाप, महिला जिल्हा संघटक सौ. शिल्पा सुर्वे, युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई, कांचन नागवेकर, विभाग प्रमुख सचिन सावंत, महिला विभाग प्रमुख विद्या ताई बोंबले, सरपंच तन्वी कोकजे, सागर म्हापुस्कर, प्रमोद डांगे आदी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…
Exit mobile version