मारुती मंदिर परिसरात भाजी विक्री करणाऱ्या महिलांच्या अडचणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केल्या दूर.

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे मारुती मंदिर परिसर या ठिकाणी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून अनेक महिला आपला शेतमाल, भाजीपाला, फळे विक्रीसाठी आणत असतात फणसवळे, शिरगाव, भाटे, पोमेंडी आदी भागातून या महिला येतात.
भाजी विक्री करणाऱ्या या महिलांचे अनेक प्रश्न होते. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मारुती मंदिर येथे धाव घेतली. तेथील महिलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतल्या रत्नागिरी नगरपरिषदेतील मालमत्ता विभागाचे अधिकारी पाटील सर यांच्याशी बोलून फळ, भाजी विक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या त्यांनी सोडविल्या भाजी विक्री करणाऱ्या महिलांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह संकेत कदम, पिंट्या देसाई आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..
Exit mobile version