वर्धापन दिनानिमित्त कल्पना कॉलेज मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू..

लांजा : २७ ऑगस्ट २०२१ रोजी कल्पना कॉलेज ची स्थापना लांजा येथे करण्यात आली. हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग डिप्लोमा, ईसीजी टेक्नॉलॉजी व बेसिक नर्सिंग या सारखे व्यवसाय व नोकरी उपयुक्त अभ्यासक्रम कल्पना कॉलेज च्या माध्यमातून सुरू आहेत पण आज कल्पना कॉलेज तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत असताना मागील कॉलेज तर्फे नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली.
आय केअर, ब्युटी केअर , इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व इंडस्ट्रियल अकाउंट, फॅशन डिझायनिंग सारख्या क्षेत्रातील वाढत्या संधीचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेता यावा. या उद्देशाने कॉलेज मध्ये या सर्व क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या बॅच लवकर कॉलेज तर्फे सुरू करण्यात येणार आहेत. या प्रसंगी ब्युटीपार्लर लॅब, कॉम्प्युटर लॅब व फॅशन डिझायनिंग लॅब च उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना कॉलेज च्या मागील दोन वर्षातील काम व विविध उपक्रम यांचं कौतुक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
यावेळी मंचावर इंफिगो आय केअर चे सर्वेसर्वा डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई , न्यू एज्युकेशन सोयायटी चे उपाध्यक्ष, लांजा चे माजी नगराध्यक्ष मा. सुनील उर्फ राजू कुरूप साहेब, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मा. गुरुप्रसाद देसाई, लांजा येथील प्रसिद्ध ब्युटीशियन सौ. श्वेता पन्हाळकर मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या मा. सौ. शमा थोडगे मॅडम, महिला सामाजिक कार्यकर्त्या मा. तिलोत्तमा खानविलकर, टेलिव्हिजन व नाट्य अभिनेता मा. किशोर साळुंखे, युवा सामाजिक कार्यकर्ते मा. अरबाज नेवरेकर, कल्पना असोसिएशनचे चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. मंगेश चव्हाण, कॉलेज चे प्राचार्य प्रा. विकी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच प्रा. तेजस्वी मोरे, प्रा. अंकिता चव्हाण, प्रा. उर्मिला माजळकर, ब्युटीशीयन कु. कामिनी आयरे, व सर्व विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात
Exit mobile version