वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीची स्थापना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अध्यक्ष.

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे अचानक अधिवेशन जाहीर केल्याने या पाच दिवसात मोदी सरकार कोणता निर्णय घेणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
           मोदी सरकारने अचानक पाच दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविल्याने देशात पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. एक देश एक निवडणुकीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने  ही माहिती दिली आहे. एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
            एक देश एक निवडणूक यावर केंद्र सरकारचा हेतू स्पष्ट नाही त्याची आता गरज नाही बेरोजगारी आणि महागाईचे निदान आधी केले पाहिजे अशी टीका काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केले आहे. अचानक अधिवेशन बोलविल्याने मोदी सरकार कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. 18 ते 22 सप्टेंबर पर्यंत या अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. या कालावधीमध्ये काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

दखल न्यूज महाराष्ट्र.
                                            

जाहिरात..
Exit mobile version