भारत शिक्षण मंडळ आयोजित’ गुरुवर्य कै .अच्युतराव पटवर्धन ‘ वक्ता दशसहस्त्रेषु जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न.”

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी गुरुवर्य कै. अच्युतराव पटवर्धन यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते . यावर्षीही ही स्पर्धा मोठया उत्साहात पटवर्धन हायस्कूल ,रत्नागिरी येथे संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य कै. अच्युतराव पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व  सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सदस्य मा . श्री .विनायक हातखंबकर , संस्थेचे विश्वस्त व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . डॉ . श्री . चंद्रशेखर केळकर , संस्थेचे कार्यवाह मा . श्री . सुनील वणजू ,संस्थेचे सदस्य मा . श्री संतोष कुष्टे, माजी मुख्याध्यापक व संस्थेचे सदस्य मा . श्री विजय वाघमारे ,पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री . राजेंद्र कांबळे , शिक्षक प्रतिनिधी श्री . संदीप कांबळे व स्पर्धेचे सर्व परीक्षक श्री. नथुराम देवळेकर , श्री . सुकुमार शिंदे , श्रीमती योगिनी भागवत , श्री . जयंत अभ्यंकर, सौ . संजना तारी ,लोकमतचे  श्री .मनोज मुळये, श्री . महेश मुळये, श्री .केतन ब्रीद आदी मान्यवर उपस्थित होते .
     उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा . श्री . विनायक हातखंबकर सर यांनी वक्तृत्वाचे अनेक पैलू उलगडून सांगितले . उत्तम वक्तृत्वातून अनेक प्रवक्ते , नेते , देशाचे प्रमुख , राजदूत , समीक्षक , विश्लेषक , समालोचक , समुपदेषक , कथाकार , कीर्तनकार , शिक्षक – प्राध्यापक घडत असतात . त्यासाठी उत्तम वक्त्याची गरज असते . ही गरज या वक्तृत्व स्पर्धेतून पूर्ण होवो , अशी अशा व्यक्त करून स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या .  गुरुवर्य कै .अच्युतराव पटवर्धन यांच्या कार्याचा या प्रसंगी त्यांनी ओघवत्या शब्दात आढावा घेतला .संस्थेचे सहकार्यवाह श्री. विनय परांजपे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या स्पर्धेचे यापुढे भविष्यात राज्यस्तरीय स्पर्धेत रूपांतर व्हावे ही सदिच्छाही यावेळी त्यांनी व्यक्त केली .
       कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा .डॉ. श्री . चंद्रशेखर केळकर म्हणाले , बोलणं म्हणजे वक्तृत्व नाही तर वक्तृत्व ही कला आहे. ते एक शास्त्र आहे . उत्तम वक्ता हा उत्तम व व्यासंगी वाचक असतो आणि त्यातून त्यांची वक्तृत्व ही कला विकसित होते . असे प्रतिपादन डॉ . चंद्रशेखर केळकर यांनी केले . या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आणि स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
           या वक्तृत्व स्पर्धेचा दुसरा टप्पा म्हणजे बक्षीस वितरण समारंभ स्पर्धा संपल्यानंतर त्याच दिवशी झाला .बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त मा . श्री . चंद्रशेखर करंदिकर तर प्रमुख पाहुणे विधिज्ञ व लेखक अॅड . श्री .विलास पाटणे, भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री . श्रीराम भावे उपस्थित होते . यावेळी बक्षीस समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलताना अॅड. श्री. विलास पाटणे म्हणाले की वक्तृत्व ही कला व शास्त्र आहे. वाचन , स्मरणशक्ती , निरीक्षण , भाषेवर प्रभुत्व , आत्मविश्वास यातून विचारांचे संस्कार आणि व्यासंगाचे प्रगटीकरण होते . वक्ता आधी स्वतःशी विचार करतो आणि त्याचवेळी श्रेत्यांशी संवाद साधत असतो. हातात कोणतं पुस्तक आहे व ओठावर कोणती गाणी आहेत यावर त्या देशाची संस्कृती ओळखता येते  आणि त्यातूनच देश घडत असतो . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . अनन्या धुंदूर व श्री . कौस्तुभ पालकर यांनी केले . श्री . संदीप कांबळे  . श्रीम. योगिनी भागवत , श्री . कैलास वाडकर आणि  विषय शिक्षकांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न झाली . यावेळी कार्यक्रमाला प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री . वसंत आर्डे , पर्यवेक्षक श्री . सत्यवान कोत्रे उपस्थित होते
           विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम ,स्तृतिचिन्ह, सन्मानपत्र व लेखक अॅड .श्री.विलास पाटणे लिखित ‘ राणी लक्ष्मीबाई ‘ पुस्तक बक्षीस देऊन गौरविण्यात आले . ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली . इयत्ता ६ वी ते ८वी गट= प्रथम क्रमांक – कु .तपस्या बोरकर , द्वितीय -आर्या यादव , तृतीय- श्रीरंग जोशी , उत्तेजनार्थ – कल्याणी साठे व श्रेया मेस्त्री , ९वी ते १२वी गट –   प्रथम क्रमांक -स्वानंदी शेंबवणे कर , द्वितीय – सानिया यादव , तृतीय – अथर्व तेंडुलकर , उत्तेजनार्थ -यज्ञा सप्रे , सोहम् नारकर , वरिष्ठ महाविद्यालय गट – प्रथम – कु. वंशिता भाटकर , द्वितीय -सिद्धी पवार , तृतीय -ओंकार आठवले , उत्तेजनार्थ -सौरभ चौगुले , सौरभ आग्रे . शिक्षक गट – प्रथम -श्री . इम्तियाज सिद्धिकी , द्वितीय s प्रांजल मोहिते , तृतीय – बाबासाहेब लाड , उत्तेजनार्थ -सौ . सोनाली खर्चे, सौ .प्राची राव .
      *दखल न्यूज महाराष्ट्र*

Exit mobile version