ग्रामसभा समूह एकसंघ झाल्यास गाव विकसित होण्यास मदत.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी
विजय शेडमाके
गडचिरोली.०८/१०/२०२३

प्रत्येक ग्रामसभेला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करणार

पुसेर ग्रामसभा इलाक्यातील २२ गावांची ग्रामसभा बैठक आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत संपन्न

वैयक्तिक व सामूहिक वन हक्क , ग्रामसभा मध्ये शौर्य फलक, अमृतवाटिका निर्माण करणे, ग्रामसभा इलाख्यातील २२ गावांची दारू बंद करणे, यासह विविध विषयांवर ग्रामसभेमध्ये चर्चा. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसभेला आत्मनिर्भर करण्याचा आपला मानस असून त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहे . त्याकरिता ग्रामसभा समूह एकसंघ होणे गरजेचे आहे असे झाल्यास प्रत्येक गाव विकसित होण्यास मदत मिळेल असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पुसेर येथील ग्रामसभेला मार्गदर्शन करताना केले.

पुसेर ग्रामसभा इलाक्यातील २२ गावांच्या ग्रामसभेची बैठक आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी नामदेव मट्टामी, मारोती गावळे, गणू नरोटे, बाबुराव झुरी, मधुकर कोवासे, रामू हेडो, लक्ष्मण गावडे, सुनील सूरी, दिवाकर हलामी, मधुकर पोटावी, केशरी मट्टामी, चिमलाल एक्का, नरेश गावडे, माधुरी आतला तथा इलाखा ग्रामसभेचे अध्यक्ष, सचिव व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत वैयक्तिक व सामूहिक वन हक्क संदर्भात असलेल्या अडचणी दूर करणे , प्रत्येक ग्रामसभांमध्ये शौर्य फलक, अमृतवाटिका निर्माण करणे, ग्रामसभा इलाख्यातील २२ गावांची दारू बंद करणे, यासह विविध विषयांवर ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आली. आपण प्रत्येक इलाखा ग्रामसभांना १५ लक्षचे सभागृह देणार असून ग्रामसभांच्या न्याय हक्कासाठी माझी लढाई असल्याचे यावेळी आमदार डॉक्टर देवराजवजी होळी म्हणाले. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version