भारतीय जनता पार्टीचे हर घर संपर्क अभियानाला रत्नागिरी शहरांमध्ये जोरदार सुरुवात.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र हर घर संपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा रत्नागिरी दौरा होताच भारतीय जनता पार्टीमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीमध्ये शहर अध्यक्ष राजन फाळके यांच्यासह स्थानिक माजी नगरसेविका प्रणाली रायकर, नितीन जाधव, मंदार खंडकर, मा.नगरसेवक राजू तोडणकर, माजी नगरसेविका सौ. रसाळ आदी. शहर पदाधिकारी यांच्याकडून रत्नागिरी शहरामध्ये प्रत्येक प्रभागात हर घर संपर्क अभियान राबविले जात आहे.

आज सकाळी नऊ वाजता प्रभाग क्र. १ परटवणे येथून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाला भाजपाचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आत्तापासूनच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मंत्री सतत या सर्वांचा आढावा घेत असून संपर्क से समर्थन या अभियानाला भाजपाकडून सुरुवात करण्यात आली आहे. आणि नागरिकांचा देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version