लांजा – (प्रमोद तरळ) आदरणीय खा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशाने, मा. आमदार श्री. जयंत पाटील ( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रा. कॉ. पा. )यांच्या आशीर्वादाने, तसेच मा. आमदार श्री. मिलिंद अण्णा कांबळे ( महाराष्ट्र अध्यक्ष – वाहतूक विभाग रा. कॉ. पा.)यांच्या नेतृत्वाखाली श्री. प्रशांत अशोकराव खानविलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.. आहे
लांजा तालुक्यातील मौजे बेनी बुद्रुकचे सुपुत्र श्री प्रशांत खानविलकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाहतूक विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री खानविलकर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे श्री खानविलकर यांना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आ. जयंत पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाचे अध्यक्ष मा.मिलिंद अण्णा कांबळे, मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव, साऊथ मुंबई अध्यक्ष रुपेश खांडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते