राजापूर – (प्रमोद तरळ) शिवगर्जना क्रीडा मंडळ सौंदळकरवाडी (ताम्हाणे) यांच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय पूर्व माध्यमिक (५ वी) च्या विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा गुरुवार दि. ०८. फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली यामधे १५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या परीक्षेमधे एकूण ३ क्रमांक व २ उतेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक – सार्थकी प्रसाद पांचाळ (सोलिवडे), द्वितीय क्रमांक – श्रुती भास्कर घुमे (तुळसवड नं २) तॄतीय क्रमांक – पलक चंद्रकांत नमसे (ताम्हाणे न. १), आणि उतेजनार्थ ४ था क्रमांक – लावण्या नरेश चव्हाण (ताम्हाणे न. ४), ५ वा क्रमांक- सान्वी संदीप चव्हाण (ताम्हाणेन. २,) या विद्यार्थ्यांनी पटकावले. या परीक्षेसाठी सौ. कुडतरकर मॅडम यांनी परीक्षण केले. तसेच परीक्षेच्या संचालक पदी चव्हाण सरांनी काम केले. परीक्षेला मार्गदर्शक म्हणून नाईक सर, थोरबले सर, नागरगोजे मॅडम, तांबे सर, गावडे सर, यांनी सहकार्य केले. तसेच शिवगर्जना मंडळाला मार्गदर्शक म्हणून प्रसाद काकिर्डे सर आणि विश्वनाथ काकिर्डे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व विजेता आणि सहभागी विद्यार्थांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि मोलाचे सहकार्य लाभलेल्या शिक्षकवृंदांचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या तसेच यापुढे हि अशीच मदत करत राहू असे आश्वासन शिवगर्जना क्रीडा मंडळाकडून देण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- Home
- शिवगर्जना क्रिडा मंडळ सौंदळकरवाडी (ताम्हाणे) आयोजित शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षेत सार्थकी पांचाळ प्रथम, द्वितीय श्रुती घुमे..