फुपेरे (भोवडवडी) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भव्य महाशिवरात्री उत्सव.

राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील भोवडवाडी विकास मंडळ (फुपेरे) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भव्य महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वा.पूजाविधी, स. १० वा. आरती व तीर्थ प्रसाद, दु. २ वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी ६ वा. स्वागत समारंभ, सायं. ७ ते‌ ९.३० या वेळेत बुवा श्री समीर कदम (श्री लिंगरवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पोखरण ता. कुडाळ) विरुद्ध बुवा श्री अभिषेक शिरसाट (श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ, हरकुळ बुद्रुक,ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) यांच्या मध्ये भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. तरीही भक्तजनांनी या महाशिवरात्री उत्सवानिमित्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष मनोहर श्री भोवड, सचिव रविंद्र सि. भोवड, खजिनदार चंद्रकांत श्री भोवड यांनी भोवडवाडी विकास मंडळाच्या वतीने केले आहे अधिक माहितीसाठी – ९८२०३६२५९९, ९४०३४१५२५८, ८२७५६६५५९३, ९२०९३५५२५८, ७२०८०१८५२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

Exit mobile version