बातम्या

श्रीराम क्रिडा मंडळ,निवे रामवाडी आयोजित “श्रीराम चषक २०२४” स्पर्धा कळवा येथे थाटामाटात संपन्न.

ठाणे:- (प्रमोद तरळ)
१५ गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्रीराम क्रिडा मंडळ निवे रामवाडी आयोजित “श्रीराम चषक २०२४” ह्या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा दिनांक १ जून २०२४ ते २ जून २०२४ रोजी दरम्यान खारलँड मैदान, दत्तवाडी, कळवा येथे यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.सदर स्पर्धेत फेडरेशन अंतर्गत पंधरागाव विभागातील २४ तुल्यबळ संघांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत राधाकृष्ण ११, धामणंद वगळाचा माळ ह्या संघाने प्रथम,जय गणेश पोसरे संघाने द्वितीय,तलवट ग्रामीण स्टार संघाने तृतीय आणि जय महालिंग धामणंद संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. चोरवणे जखमीचीवाडी संघ शिस्तबद्ध संघाचा मानकरी ठरला.वैयक्तिक पारितोषिके स्वरूपात जय गणेश पोसरे संघाचा अष्टपैलू खेळाडू फैजल चिपळूणकर हा स्पर्धा मालिकावीर ठरला, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा धामणंद वगळाचा माळ संघाचा वैभव अदावडे, उत्कृष्ट गोलंदाज धामणंद वगळाचा माळ संघाचाच रोशन उतेकर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा जय गणेश पोसरे संघाचा ओमकार राजमाने ठरला. स्पर्धेला विविध मान्यवर ह्यांनी भेट दिली त्यात पंधरागाव विभागातील मान्यवर,१५ गाव क्रिकेट फेडरेशन,शिवशंभो क्रिडा मंडळ-‌ निवे,श्रीराम ग्रामविकास मंडळ,मुंबई-पुणे,जल फाऊंडेशन कोकण विभाग (रजि),संकल्प सामाजिक सेवा संस्था तसेच खेड तालुका कोकण रहिवासी मंच, दिवा अशा विविध संस्थेचे पदाधिकारी ह्यांचा समावेश होता. स्पर्धा यशस्वी करण्यामागे श्रीराम क्रिडा मंडळातील सर्वच पदाधिकारी आणि सभासद तसेच १५ गाव क्रिकेट फेडरेशनचा मोठा वाटा राहिला.श्रीराम क्रिडा मंडळातर्फे स्पर्धेस हजेरी लावलेले मान्यवर,‌ पुरस्कर्ते,देणगीदार, मंडळाला सहकार्य करणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हात ह्या सर्वांचेच आभार मानण्यात आले.

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!