बातम्या

लांजा तालुक्यातील कोट गावचे उपसरपंच रवींद्र उर्फ रव्या नारकर यांनी राणे निवडून येण्यासाठी केला होता पण 1 महिना चप्पलविना प्रचारात पायपीट

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांचा दणदणीत महाविजय..

रत्नागिरी :  देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पारपडल्या होत्या त्याचा निकाल मंगळवार दि 4जून 2024 रोजी लागला .त्यात देशात NDA ला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यातच कोकणातील रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचे नेते नारायण राणे रिंगणात होते आणि ते विजयी सुद्धा झाले. कोकणातील ही जागा अनेक वर्षानंतर भाजपला मिळाली आहे. ही जागा निवडुन येण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अपार कष्ट करून प्रचार केला होता, त्याचा परिणाम रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला आहे.
        अशातच कोट गावचे उपसरपंच आणि राणे-मोदी कट्टर समर्थक म्हणून सर्वपरिचित असलेले रवींद्र उर्फ रव्या नारकर यांनी राणेंना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावली होती. निवडणूक पार पडल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत गाव वाडी, वस्ती, शासकीय कार्यलय आणि विशेष करून दुर्गम भागामध्ये ऐन उन्हाळ्यात छप्पलविना अनवाणी पायाने आमचे साहेब निवडून येण्यासाठी पण केला होता आणि अखेर केलेला पण प्रत्यक्षात यशस्वी झाला. त्यामुळे असे प्रामाणिक कार्यकर्ते नेत्यांना मिळणे हे भाग्यच आहे. राणे साहेबांवर प्रेम करणारे असे शेकडो कार्यकर्ते हीच त्यांची खरी संपत्ती आहे त्यामुळे तालुक्यातून, जिल्ह्यातून रवींद्र नारकर यांची प्रमुख नेत्यांनी दखल घेऊन अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला पुढे आणणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे..
             स्वतः नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांनी कौतुकाची पाठीवर थाप देतील अशी इच्छा व्यक्त केली..

दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!