बातम्या

नगरी शाळेच्या मुख्यध्यापकाच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळाले एक लाख रुपये.

               जिल्हा परिषद नगरी  शाळेत शिकणाऱ्या व आई किंवा वडील नसणाऱ्या एकूण  07 विद्यार्थ्यांना शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत बालसंगोपन   योजनेचा जवळपास वार्षिक एकूण एक लक्ष रुपये लाभ मिळाला  आहे व समोरच्या वर्षाला पण मिळणार आहे. शाळेतील  मुख्याध्यापक श्री राजू घुगरे यांच्या तीन वर्षापासूनच्या विशेष प्रयत्नातून सर्व लाभार्थी सात विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थी दरमहा 2250 रुपये (वार्षिक दरवर्षी 27000 रुपये )लाभ या वर्षी नुकताच मिळाला आहे,
प्रस्ताव मंजूर झालेले लाभार्थी विद्यार्थी
1)मोनालीअरुण आभारे,
2)  गौरव अरुण आभारे,
3)विवेक दुधराम वाकडे,
4)स्मिथ दूधराम वाकडे,
5) माही मच्छिंद्र मेश्राम,
6)प्रगती दिलीप वैद्य,
7)राजरत्न दिलीप वैद्य,
वरील सर्व विद्यार्थ्यांचे विहित नमुन्यात प्रस्ताव  वारंवार तयार करून संबंधित कार्यालयाकडे दाखल करणे व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे तसेच प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करुन शाळेतील अत्यंत गरजू, गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल श्री राजेंद्र घुगरे सर यांचे  नगरी शाळेचे वतीने, पालक वर्ग,  नगरी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय: राजुभाऊ नैताम, उपाध्यक्ष  सौ: स्वाती मेश्राम, सदस्य श्री: रंजीत बारसागडे, दिलीप सातपुते, अनिल बारसागडे, अनिरुद्ध बारसागडे, माणिक वाकुडकर,
रसिका मेश्राम, वर्षा आसोदेकर, लोपा बारसागडे, अर्चना कोटगले, कमलेश कोल्हे, ज्योती कोटगले,
व पालक म्हणून श्रीमती. ज्योती मच्छिंद्र मेश्राम, रेखा दिलीप वैद्य, लिलन दुधराम वाकडे, यामिना अरुण आभारे , यांच्या वतीने नुकतेच अभिनंदनपर सत्कार करण्यात आले….

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!