बातम्या

पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिथे जिथे खड्डे असतील ते त्वरित बुजवावे स्थानिक तरुणाने केली मागणी.

पिंपरी चिंचवड : काळेवाडी ज्योतिबा नगर येथील डेलीसिअस पूना बेकर्स समोर रोड वरती मधोमध रस्त्याचे काम करत असताना खड्डा पडला आहे आणि या खड्ड्यामध्ये तीन ते चार दिवसात अंदाजे १०० ते १५० दुचाकी या खड्ड्यामध्ये आदळून काही लोक जखमी झाले तर काहींना मुका मार लागला आहे तरी सदरील तक्रार महानगरपालिका मध्ये करून देखील सुद्धा अद्याप कोणीही तक्रारीकडे लक्ष दिले नाही तरी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता तेथील युवकांनी पुढाकार घेऊन त्या खड्ड्याच्या बाजूला लोखंडी बॅरिकेट उभे केले यावेळी उपस्थित युवा नेते श्री रुपेश तापकीर श्री रुपेश मोरे ॲड श्री योगेश नढे, श्री राहुल ढोणे, श्री सूरज पवार, कुणाल पाटील, पांडू राजुरे, महेश काळे, रोहित भोरे या सर्व युवकांनी एकत्र येऊन बॅरिकेट लावले बॅरिकेट लावल्यानंतर तेथे वाहनचालक सावध झाले आहेत तरी प्रशासनाला विनंती आहे कि असे खड्डे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिथे जिथे असतील ते त्वरित बुजवावे सध्या पावसाचे दिवस असल्या कारणाने खड्डे दिसून येत नाहीत तरी आपण याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!