बातम्या

लांजा बौध्दवाडीतील विहिरीत पडलेल्या खवले मांजराला वनविभागाकडून जीवदान….

लांजा ‘;- (प्रमोद तरळ) तालुक्यातील बौद्ध वाडीतील सुधाकर गोपाळ कांबळे यांच्या आंबा काजू बागेतील विहिरीत पडलेल्या खवले मांजराला वनविभागाकडून जीवदान देण्यात यश आले आहे
आपल्या विहिरीत खवले मांजर पडल्याची माहिती सुधाकर कांबळे यांनी मोबाईल वर दिल्यानंतर वनरक्षक, वनपाल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले विहिरीत पडलेल्या खवले मांजराला दोरीच्या सहाय्याने प्लास्टिक टोपले टाकून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले या खवले मांजराची लांजा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली खवले मांजर सुस्थितीत असल्याची खात्री करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनरक्षक व्ही एस.बोराटे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी व्ही आरेकर, वनरक्षक श्रीमती एन एच कांबळे, श्रीमती एच पी पवार,अमित लांजकर यांनी ही कार्यवाही केली अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रकाश सुतार यांनी केले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!