बातम्या

अणुस्कुरा घाटातील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर, दुचाकीसह छोट्या चारचाकी कारची वाहतूक सुरू…

राजापूर – : (प्रमोद तरळ)
पाऊस नियमित सुरू होण्याआधीच राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली आणि कोल्हापूरकडे जाणारा हा घाट बंद झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत येथे ब्लास्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजूनही पूर्ण मार्ग मोकळा झालेला नाही. दरम्यान शुक्रवारी दुपारनंतर दरडीचा काही भाग हटवण्यात यश आल्याने घाटातुन दुचाकी व चारचाकी कारची वाहतुक सुरु करण्यात आली आहे .
गेली अनेक वर्षे पावसाळ्यात दरडी कोसळणारा मार्ग अशीच अणुस्कुरा घाटाची ओळख आहे. राजापूर तालुक्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या घाटात अणुस्कुरा गावाच्या पहिल्याच वळणावर भलीमोठी दरड रस्त्यावर आली आणि मार्ग बंद झाला. दरड मोठी असल्याने सकाळपर्यंत मार्ग बंद राहील, हे आधीच जाहीर करण्यात आले. ब्लास करुन दरड फोडण्याचे काम सकाळपासून अखंडितपणे सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली मातीही हटवली जात आहे. मात्र दुपारपर्यंत रस्ता पूर्ण मोकळा झाला नव्हता.
दुपारनंतर रस्त्यावर पडलेल्या या दरडीचा काही भाग ब्लास्ट करुन हटवण्यात यश आल्याने घाटातुन एकेरी दुचाकी व चारचाकी छोट्या कारची वाहतुक सुरु करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्निल बावधनकर यानी दिली आहे . मात्र अजुनही बराचसा दरडीचा भाग शिल्लक असल्याने ही दगड ब्लास्ट करुन फोडण्यात येणार आहे परिणामी वाहतुक पुर्ववत होण्यास शनिवार दुपारपर्यंतचा काळ जाण्याची शक्यताही बावधनकर यानी वर्तवली आहे .
सध्या रस्त्याची एक बाजू साफ करुन दुचाकी व चारचाकी छोट्या कारची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तोपर्यंत या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशानी अन्य मार्गाचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग राजापूर केले आहे.
अनुस्कुरा घाटात दरड कोसळून तब्ब्ल २३ तासानंतर एकेरी वाहतूक (अवजड वाहने सोडून )काल सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग राजापूर ला यश आलं आहे..
एकंदरीत रस्त्याच्या मध्यभागी दगडाच्या वजनाने पडलेला मोठा खड्डा, दगडाचे छोटे-मोठे भाग,माती.. यामुळे रस्ता साफ करण्यास थोडा विलंब लागण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने उद्या सकाळ किंव्हा दुपार पर्यंत या घाटातील वाहतूक ( अवजड वाहनासहित ) पूर्णपणे सुरळीत चालू होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळवण्यात आले आहे.. तरी वाहनधाराकांनी आपली वाहने सावकाश आणि सुरक्षितरित्या या मार्गाने मार्गस्थ करावीत असे आवाहनही कारण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झाला असला तरी तो अजूनही नियमित झालेला नाही. मात्र तरीही येथे दरड कोसळल्याने मुसळधार पावसात या मार्गाचे काय होणार, याबाबत प्रश्नच आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!