बातम्या

नाणीजच्या भुयारी मार्गासाठी पाठपुरावा करणार. :संजय निवळकर.

महामार्गाचे काम भाजपचे पदाधिकारी संजय निवळकर आणि कार्यकर्ते यांनी थांबवले.

रत्नागिरी : नाणीज गावातील रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे महामार्गावर नाणीज गाव बस थांबा येथे भुयारी मार्ग किंवा ३५० मीटर अंतरावर उड्‌डाणपूल उतरवून मिळणे आवश्यक असल्याने या संदर्भात खासदार नारायण राणे यांना नाणीज ग्रामपंचायतीने निवेदन सादर केले आहे. त्यानुसार भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी नाणीज गावात भेट देऊन पाहणी केली दरम्यान नाणीज येथील नाणीज गाव बस थांबा (बाजार पेठ तळवाडी) बाजारपेठ येथे रहदारी व वाहतुकीसाठी भुयारी मार्ग प्रस्तावित करून मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे संजय निवळकर यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी महामार्गाच्या ठेकेदारांनी या भागातील काम सुरू केल्याने संजय निवळकर आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी तातडीने पोहोचले. व सदरचे काम थांबवण्याची विनंती केली. या मार्गामध्ये भुयारी मार्ग होणे आवश्यक असल्याने हे काम थांबविल्याचे संजय निवळकर म्हणाले. यावेळी संजय निवळकर यांच्यासह वसंत दरडी, संदीप सावंत, चिराग खटकूळ, चिन्मय खटकूळ, प्रशांत संसारे, रविंद्र संसारे, सुशील संसारे, निखिल संसारे, महेश पडवळ, अमित कांबळे, प्रीतम कांबळे, रविंद्र दरडी, मुन्ना भागवत, बंटी सावंत, विनोद पटेल, साहिल खटकूळ, प्रविण खटकूळ, रामदास सावंत, बावा रेवाळे, आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाणिज, चोरवणे, शिरंबवली येथील ग्रामस्थांना या कार्यालयात, बाजारपेठेत. जाण्यासाठी तसेच दवाखान्यात रुग्णाला घेऊन जाण्यासाठी कुटुंबातील लोकांना प्रचंड कसरत, त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग प्रस्तावित नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ६०० ते ७०० मीटर पायी चालत जाऊन पुन्हा उलट मार्गानी यावे लागत आहे. तसेच या मुख्य रस्त्यालगत लांजा तालुक्यातील शिरबवली, नांदिवली व अंजनारी ही गावे असून या गावांमध्ये एक रेल्वे स्थानक प्रस्तावित असून तसा ठराव पाठवण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानक झाल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रहदारी वाढणार आहे. नाणीज बाजारपेठेतून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरू असून नाणीज गाव बस थांबा येथून आहे. या मुख्य रस्त्या लगतच शिरबवली व चोरवणे या गावांना जोडणारे रस्ते आहेत. तेथील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोज येथून बसचा प्रवास करावा लागतो तसेच रस्त्या पलीकडे नाणीजची घडशीवाडी, दरडीवाडी, खावडकरवाडी, तळवाडी या वाडीतील ग्रामस्थांची शेती असून या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकरी जनावरे व शेतीचे उपकरणे वाहतूक करीत असतात. तसेच ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बैंक ऑफ इंडियाचे सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस दवाखाना, मेडिकल हे सर्व मुख्य बाजारपेठेत असून हा मार्गावरील उड्डाणपूलामुळे बाजारपेठेचे दोन भाग पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी यानंतरही पाठपुरावा करणार असल्याचे संजय निवळकर यांनी सांगितले.

What's your reaction?

Related Posts

1 of 285

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!