आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात “टच ऑर्गनायझेशन” आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक समारंभ संपन्न.

“टर्निंग अपॉर्च्युनिटी फॉर अपलिफ्टमेंट अँड चाईल्ड हेल्थ (टच ऑर्गनायझेशन)” यांनी बालदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या “क्रिएटिव्ह टच” या चित्रकला स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना सन्मानित केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक, कलाशिक्षक प्रदीप शिवगण व सुरज मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
बक्षीस पात्र विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांच्या स्वागतानंतर प्रा. धनंजय दळवी यांनी टच ऑर्गनायझेशनचे सामाजिक कार्य व क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धेविषयीची माहिती उपस्थिताना दिली. तीन गटात आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सन्मानित विद्यार्थी खालील प्रमाणे:-
गट क्रमांक-१ (ई.४थी ते ६वी)
भावना दत्तात्रय सावंत- द्वितीय क्रमांक (प्रशस्तीपत्रक व चेक रु.५०००/-)-छत्रपती शिवाजी आदर्श विद्यालय, देवरुख नं.४
गट क्रमांक-२ (ई.७वी ते ९वी)
मृगजा मिलिंद जुवेकर- द्वितीय क्रमांक (प्रशस्तीपत्रक व चेक रु.५०००/-)-अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुख.
दर्शन प्रकाश शिवगण- उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र व चेक रु.१०००/-)-शिवाजी माध्यमिक विद्यालय, वांझोळे.
गट क्रमांक-३ (ई.१०वी ते १२वी)
साहिल सुरेश मोवळे- प्रथम क्रमांक (प्रशस्तीपत्रक व चेक रु. १०,०००/-)- आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख.
प्रज्वल महेश घडशी- तृतीय क्रमांक (प्रशस्तीपत्रक व रू. २५००/-)- दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी सुयोग चंद्रकांत रहाटे याने आय.सी.एस. महाविद्यालय, खेड, रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तसेच आशिष दीपक बाईत याने जिल्हा शालेय कॅरम स्पर्धेतील (१९ वर्षाखालील) एकेरी गटात विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य सरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही कलेमध्ये अगर खेळामध्ये पारंगत व्हायचे असेल तर नियमित सरावासोबत, सततचे वाचन मनन, चिंतन अत्यावश्यक असल्याचे याप्रसंगी प्रतिपादन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांने शारीरिक स्वास्थ्य व मानसिक आरोग्यासाठी चौरस आहार घेतला पाहिजे. फास्ट फूड व बाजारात मिळणाऱ्या अनैसर्गिक पेयांपासून दूर राहिले पाहिजे. नियमित व्यायाम व प्राणायाम यामुळे शरीर संपदा उत्तम राखली जाते, याबाबत सजग रहा. मोबाईलचा वापर कमीत कमी व गरजेपुरता करा. मोबाईल पेक्षा मैदानी खेळांना अधिक प्राधान्य द्या असे आग्रही मत याप्रसंगी प्राचार्य महोदयांनी व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या मनोगताची सांगता केली.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांचे आभार धनंजय दळवी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्राध्यापक सुभाष मायंगडे, विद्यार्थी सागर जाधव, सहाय्यक हेमंत कदम यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी समाधान व्यक्त केले.
फोटो- १. ‘टच क्रिएशन’ चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसोबत प्राचार्य डॉ
तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील, ग्रंथपाल प्रा. मायंगडे, प्रा. दळवी आणि इतर.
२. कॅरम जिल्हा विजेत्या आशिष बाईत याला सन्मानित करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर आणि इतर.

Exit mobile version