आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सोबत मलेशियाच्या एशियन बांबू सस्टेनिबिलिटीचे सीईओ रघु वेडी कोंडन व सचिन शेट्टी यांची एमआयडीसी मधील बांबू प्रकल्पाला भेट.

विजय शेडमाके.
दिनांक ८ ऑक्टोंबर २०२३

गडचिरोली एमआयडीसी परिसरात असलेल्या गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बांबूच्या प्रत्येक घटकावर प्रक्रिया करून नवीन उत्पादन, नवीन वस्तूंची निर्मिती करण्यासाठी गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रकल्प व मलेशिया सिंगापूरच्या टेक्नॉलॉजीच्या संयुक्त उपक्रमातून (जॉईन्ट वेंचर ) या प्रकल्पाचा अधिक विकास करण्याची आवश्यकता असल्याचे मलेशियाच्या एशियन बांबू सस्टेनिबिलिटीचे सीईओ रघु वेडी कोंडन यांनी एमआयडीसी मधील बांबू प्रकल्पाला भेट दिली म्हटले आहे.

याप्रसंगी गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रकल्प सीईओ विनयजी वाडिया यांनी प्रकल्पाबाबतची विस्तृत माहिती दिली. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी , मुंबईचे मलेशियातील व्यवसायी सचिन शेट्टी , प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पंकज भाऊ खोबरे सुपरवायझर चेतन गुणुले उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता मलेशियाच्या एशियन बांबू सस्टेनिबिलिटीचे सीईओ रघु वेडी कोंडन यांना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बोलाविले . त्यांना घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील विविध ग्रामसभांना भेटी दिल्या. त्यांनी बांबू वर आधारित कामाची माहिती जाणून घेतली. गडचिरोली एमआयडीसी परिसरात नव्याने सुरू झालेल्या गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली असता त्या ठिकाणी बांबू पासून फर्निचर उपयोगी वस्तु तयार करण्यात येत असल्याचे त्यांना दिसून आले.

बांबूचा एकही भाग वाया जात नाही. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग करून कोणती ना कोणती वस्तू तयार केली जाते. बांबू पासून टी-शर्ट, साडी, लाकूड निर्मिती सह अन्य महत्वपूर्ण व जीवन उपयोगी वस्तू तयार करता येवू शकतात.मात्र या ठिकाणी वेस्ट मटेरियल अधिक दिसल्याचे पाहून त्यांनी मलेशिया सिंगापूर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रकल्प व मलेशिया सिंगापूरच्या टेक्नॉलॉजीच्या संयुक्त उपक्रमातून (जॉईन्ट वेंचर ) हे करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. असे केल्यास जिल्ह्यातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होईल व आर्थिक विकास होण्यास मदत मिळेल असेही ते म्हणाले. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version