बातम्या

केंद्रीय पूरतत्व विभागाच्या नोटीसीला जे.एस.डब्ल्यू कडून केराची टोपली,कंपनीवर एफआयआर दाखल करणार -केंद्रीय पुरातत्व विभाग

अनधिकृत काम थांबविण्यासाठी पुरातत्व विभागाची दुसरी नोटीस

■ समिर शिरवडकर- प्रतिनिधी.

रत्नागिरी:- केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेला किल्ले जयगड च्या बुरुजाला जे.एस.डब्लू पोर्ट च्या कामासाठी चाललेल ड्रेजिंग आणि ड्रीलिंग च्यासततच्या कामामुळे किल्ल्याच्या बुरुजांना तडे गेलेच वृत्त आज दोन महिने टीव्ही मिडीयाच्या माध्यमातून जगजाहीर झालें असले तरी,आणि केंद्रीय पुरातत्व विभागाने काम तत्काळ बंद करण्याचे आदेश देऊनही आज तागायत ड्रिलिंग आणि ड्रेजिंग चे काम सुरू आहे.याचाच अर्थ या शासनाच्या आदेशाला जे.एस. डब्लू पोर्ट ने केराची टोपली दाखविल्याचे उघड झाले आहे.म्हणजेच मुजोर आणि बलाढ्य हुकूमशाही शाही समोर शासन झुकल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान,पुरातत्व विभागाकडून पहिल्या नोटिस ची कारवाई दि.२८-०२-२४ ला करण्यात आली असून,अजूनही अनधिकृत काम सुरु असल्याने केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दुसरी स्टॉप नोटीस दि.०५-०३-२४ ला जे.एस.डब्लू ला दिली आहे.परंतु पहिल्या नोटीस ला दाद न देता मुजोर हुकूमशाही कंपनीने आपले म्हणणे दि.१३-०३-२४ ला देऊन आम्ही ड्रीलिंग आणि डेजिंग चे काम करीत नसल्याचे पत्राद्वारे सांगितले आहे.परंतु या आधी पंचयादी करून ,रत्नागिरी तहसीलदार, आणि समनधित पुरातत्व विभागाने सुद्धा तसा अनधिकृत कामाबद्दल अहवाल देऊन सुद्धा जे.एस.डब्ल्यू खोटे पत्रव्यवहार करीत असलेच उघड झाले आहे.
या संपूर्ण विषयी जे.एस. डब्ल्यू चे चाललेलं अनधिकृत काम तात्काळ थांबविण्यासाठी समनधित जिल्हाधिकारी रत्नागिरी,जयगड पोलिस ठाणे, जयगड ग्रामपंचायत, आणि मुख्य कार्यलाय मुंबई,सायन यांना देखिल पत्रव्यवहार करून ही, आज तागायत कोणीही यांवर कारवाई न केल्याने नेमके किल्याबबात कुणाला आस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.की मुजोर हुकूमशाही विरोध शासन गप्प का?असा सवाल ही उपस्थित होतो.हा सर्व प्रकार पाहता,जे.एस.डब्ल्यू वर कारवाई होईल की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहील.
दरम्यान दैनिक चालु वार्ता शी बोलताना पुरातत्व विभाकडून अस सांगण्यात आले आहे की,आम्ही या मार्च अंती जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या विरोधात एफआयआर दाखल करणार आहोत.

What's your reaction?

Related Posts

1 of 274

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!