बातम्या

रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवरील खडी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये मुख्य रस्त्यावर मागील वर्षभरात दोन ते तीन वेळा डांबरीकरणाचे काम केले गेले. तरीदेखील हे डांबरीकरणाचे काम निकृष्ट प्रकारचे असल्याचे आरोप अनेकदा नागरिकांमधून केली गेले. सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यासाठी डांबरीकरण करून रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवर नव्याने रस्ता करण्यात आला होता. मात्र हा रस्ता पावसामध्ये पूर्णपणे खराब झाल्याने या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडू लागले, व डांबरीकरणातील खडी ही पूर्णपणे वर आली. परिणामी रत्नागिरी शहरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अपघाताचे प्रमाण वाढले. अनेकांच्या गाड्या या खडीवरून स्लिप होत होत्या. अपघात होऊन दुखापत होत होती. रत्नागिरीतील रस्ते या विषयावर नागरिकांनी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात बोलायला सुरुवात केलेली पाहायला मिळत होती. अनेकांनी रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.

जाहिरात….

अखेर रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावरील खडी गोळा करण्यासाठी जेसीबी व तत्सम यंत्रसामग्री जोरदार कामाला लागली असून ही खडी गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे काही प्रमाणात रत्नागिरीकरांना दिलासा मिळत आहे. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, जयस्तंभ, गोगटे जोगळेकर कॉलेज रोड, हे रस्ते सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मिरवणुकीतील विठ्ठल खड्ड्यांमध्ये उभा राहत काढलेला फोटो हा देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला.किमान या रस्त्यावरील खडी गोळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून काही प्रमाणात का होईना रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा मिळत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!